पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : स्मिथ-स्टॉयनिस चूक कोणाची?

स्टॉयनिस-स्मिथ यांच्यातील ताळमेळ बिघडल्याचा क्षण

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात डावातील ४२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाने स्टॉयनिसच्या रुपात पाचवा गडी गमावला. स्टिव्ह स्मिथ आणि स्टॉयनिस यांच्यातील ताळमेळ चुकल्याने ऑस्ट्रेलियाने ही विकेट गमावली. क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करताना दोन्ही गड्यांच्यात ताळमेळ असणे महत्त्वपूर्ण असते.

स्मिथ-स्टॉयनिस यांच्यामध्ये याची कमतरता पाहायला मिळाली. सामन्यात स्टीव्ह स्मिथ आणि मार्कस स्टॉयनिस यांच्यात गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. आदिल रशिदने स्मिथला चेंडू टाकल्यानंतर त्याने पहिली धाव पूर्ण केली. ही धाव पूर्ण केल्यानंतर स्टॉयनिस दुसऱ्या धावेसाठी माघारी फिरला. तो सुसाट नॉन स्ट्राईककडे धावात असताना स्मिथ एक धाव करुन थांबला होता.

Video : विंडीज विरुद्धच्या सामन्यापूर्वी भुवीचा कसून सराव

दोघेही नॉन स्ट्राईकच्या दिशेला पोहोचल्याचे दिसताच आदिल रशिदने कोणतीही चूक न करत शांतपणे चेंडू यष्टिरक्षकाकडे दिला. यष्टिरक्षकाने आपली जबाबदारी चोख बजावत स्टॉयनिसला माघारी धाडले. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी अवघ्या १५ धावांची भागीदारी केली. स्टॉयनिसने १५ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ८ धावा काढल्या. त्याला बाद केल्यानंतर क्रिस वोक्सने लयीत खेळणाऱ्या स्मिथला ३८ धावांवर थांबवले.