पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video :कोहलीचा डेल स्टेनसाठी भावनिक संदेश

विराट कोहली आणि डेल स्टेन

दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज डेल स्टेन खांद्याच्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेबाहेर पडला आहे. दुखापतीमुळे मोठ्या स्पर्धेला मुकण्याचे दु:ख कदाचित तो शब्दांत कधीच व्यक्त करु शकणार नाही. पण त्याच्या भावना एका खऱ्या खेळाडूपर्यंत नक्कीच पोहचतात. विराट कोहलीने आपल्यातील खिलाडूवृत्ती दाखवून देत सलामीच्या सामन्यापूर्वी प्रतिस्पर्धी संघाच्या ताफ्यातील डेल स्टेनबद्दल आपल्या मनातील भावना व्यक्त केली. दुखापतीतून सावरुन त्याने लवकर मैदानात उतरावे, असेही विराट कोहलीने म्हटले आहे.

ICC WC 2019 : आफ्रिकेचा संघ धोकादायक : विराट कोहली

डेल स्टेन हा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू असला तरी तो कोहलीचा एक चांगला मित्र आहे. आपल्या मित्राबद्दल कोहली म्हणाला की, "डेल स्टेन स्पर्धेला मुकणार असल्याचे खूप वाईट वाटते. आम्ही खूप दिवसांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहोत. तो खूप उत्साही खेळाडू आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये होता. अचानक तो खेळणार नसल्याचे वृत्त निराशजनक होते. आफ्रिकेच्या संघात पुनरागमन केल्यानंतर तो खूप खुश होता. विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यासाठी तो उत्सुक होता."  त्याच्या पदरी पडलेली निराशा मी समजू शकतो, असेही कोहली यावेळी म्हणाला.

ICC WC 2019 : आफ्रिकेला मोठा धक्का, स्टेन 'गन' निकामी

दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ ड्यु प्लेसिसने डेलच्या दुखापतीला आयपीएल जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जर डेल स्टेन आयपीएलमध्ये खेळला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती, असे ड्यु प्लेसिस म्हटले आहे. आयपीएलच्या मैदानात स्टेन कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून मैदानात उतरला होता. २०१९ च्या हंगामात स्टेन दोन सामन्यात खेळला होता. त्यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Feeling very bad Virat Kohlis emotional message for good friend Dale Steyn WATCH Video