पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

....म्हणून सुपर ओव्हरमध्ये टाय होऊनही इंग्लंड विजयी!

स्टोक्स आणि बटलर

न्यूझीलंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना २४१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने अखेरच्या चेंडूवर बरोबर २४१ धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामुळे सामना सुपर ओव्हरवर गेला. ज्यावेळी इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी अखेरच्या षटकात १५ धावांची गरज होती. तेच आव्हान त्यांनी सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंड समोर ठेवले. सुपर ओव्हरमध्ये स्टोक्सनं ८ तर बलटलरने ७ धावा केल्या. 

इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने जोफ्रावर विश्वास दाखवला. त्याने पहिलाच चेंडू वाईड टाकला त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर नीशमने २ तर तिसऱ्या चेंडूवर षटकार खेचला. चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर प्रत्येकी दोन धावा करण्यात किवी फलंदाजांना यश आले,  अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज होती. हे षटक सामन्याच्या अगदी अखेरच्या षटकाप्रमाणेच झाले. पण, फरक फक्त आता न्यूझीलंड फलंदाजी करत होता. अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज होती त्यावेळी दुसरी धाव घेताना गप्टिल धावबाद झाला.

#ENGvNZ : ऐतिहासिक! सुपर ओव्हरमध्येही टाय, यजमान इंग्लंड विश्वविजेता

सुपर ओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटण्याची ही क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासातील पहिली घटना होती. सुपर ओव्हरमध्ये सामना बरोबरीत सुटल्यानंतर ज्या संघाने  सुपर ओव्हरमध्ये चेंडू सर्वाधिक वेळा सीमारेषेबाहेर टोलवला आहे, त्या संघाला विजयी घोषीत करण्यात येते. या नियमानुसार, इंग्लंडच्या नावे दोन चौकार आणि न्यूझीलंडच्या नावे एकच षटकार असल्याने यजमान किवींवर भारी पडला. त्यांना विश्वविजेतेचा मान मिळाला.