पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : दोन शतकांवर तीन अर्धशतकं पडली भारी, पाकचा पहिला विजय

पाकचा पहिला विजय

विश्वचषकातील सहाव्या सामन्यात पाकिस्तानी संघाची तीन अर्धशतके इंग्लंडच्या स्पर्धेतील पहिल्या वहिल्या दोन अर्धशतकांवर भारी पडली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तानने इंग्लंडला १४ धावांनी पराभूत करत स्पर्धेतील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. पाकिस्तानने दिलेल्या ३४८ धावांच्या पाठलाग करताना इंग्लंडला निर्धारित ५० षटकात ९ बाद ३३४ धावांपर्यंत मजल मारता आली. या सामन्यात पाकिस्तानकडून  बाबर आझम (६३), मोहम्मद हाफिझ (८४)  आणि कर्णधार सरफराज अहमदने ५५ यांनी तिघांनी अर्धशतके झळकावली होती. इंग्लंडकडून जो रुट (१०७) आणि जोस बटलर (१०३) शतकी खेळी करुनही त्यांना संघाला विजयापर्यंत पोहचवण्यात अपयश आले. 

पाच सामन्यानंतर दोन शतकं! स्पर्धेतील पहिले शतक जो रुटच्या नावे

ही दोघे तंबूत परतल्यानंतर मोईन अली (१९) आणि क्रिस वोक्स (२१) यांनी काही आकर्षक फटके लगावत सामन्यातील रंगत वाढवली. मात्र रियाझने या दोघांना बाद करत सामना पाकिस्तानच्या बाजूने झुकवला. पाकिस्तानकडून वहाब रियाझने सर्वाधिक तीन इंग्लंडच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तर शदाब खान आणि मोहम्मद अमीर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांनीही प्रत्येकी एक गडी बाद करत संघाच्या विजयात हातभार लावला. 

ICC WC 2019 : बुमराहची डोपिंग चाचणी

ट्रेन्ट ब्रिज, नॉटींग्‍हॅमच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने निर्धारित ५० षटकात ८ बाद ३४८ धावा केल्या होत्या. नाणेफेकीचा कौल प्रतिस्पर्धीच्या पारड्यात पडल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानला सलामवीरांनी चांगली सुरुवात करुन दिली. इमाम उल हक (४४) आणि फखर झमान (३६) धावा केल्या. त्यानंतर बाबर आझम, मोहम्मद हाफिझ, आणि कर्णधार सरफराज अहमदने संघाची धावसंख्या हलती ठेवत पाकिस्तानला आव्हानात्मक धावसंख्या उभारणे शक्य झाले. इंग्लंडकडून मोईन अली आणि क्रिस वोक्स यांनी प्रत्येकी तीन तर मार्क हुड प्रत्येकी दोन गडी बाद केले.