पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#ENGvAUS क्रिकेटच्या पंढरीत अनोखं दर्शन!

लॉर्डसच्या मैदानावर एक वेगळ चित्र पाहायला मिळाले

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडन येथील लॉर्डसच्या मैदानात यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यापूर्वी एक अनोख चित्र पाहायला मिळाले. सामन्यापूर्वी दोन्ही संघानी फोटो सेशन केले. फोटो सेशन झाल्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू आपापली खुर्ची घेऊन ड्रेसिंग रुमकडे जाताना पाहायला मिळाले. 

यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील खेळाडूंनी मैदानातील फोटो सेशननंतर चक्क डोक्यावर खुर्च्या घेऊन ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसले. त्यांच्या या कृतीचे सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. खेळाडूंच्या या कृतीवर अनेक प्रतिक्रिया उमटत असून दोन्ही संघातील खेळांडूच्या या अंदाजाचे क्रिकेट चाहते कौतुक करत आहेत. 
 

लॉर्डसवरच्या मैदानात नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना कर्णधार फिंचचे शतक आणि वॉर्नरच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने यजमान इंग्लंडला २८६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडची आघाडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर अक्षरश: नांगी टाकली. आघाडीला सुरुंग लागला असताना बेन स्टोक्सने इंग्लंडकडून ८९ धावांची आश्वासक खेळी केली. पण स्टार्कने त्याला बाद करत सामना पुन्हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकवला.

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 England vs Australia politely returned the chairs after team photo the brilliant