पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#EngvsNz Final 'वर्ल्ड कपचे विजेतेपद संयुक्तरित्या द्यायला हवे होते'

बेन स्टोक्स

विश्वचषक स्पर्धेतील इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील रोमहर्षक सामन्यात 'बाउंड्री काउंट'च्या नियमाच्या आधारे आयसीसीने इंग्लंडला क्रिकेटचा नवा विश्वविजेता ठरवले. न्यूझीलंड वंशाचा बेन स्टोक्सने इंग्लंडच्या पहिल्या विश्वचषत विजयात सिंहाचा वाटा उचलला. इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानंतर अनेक चर्चा रंगत असताना स्टोक्सचे वडील गेरार्ड स्टोक्स यांनी यंदाचा विश्व चषक इंग्लंड-न्यूझीलंड यांना संयुक्तरित्या द्यायला हवा होता, अशी भावना व्यक्त केली आहे. 

क्रिकेटचा वारसा असलेल्या लंडन येथील लॉर्डसच्या मैदानात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळाला होता. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघानी 'सेम टू सेम' शो दाखवत प्रत्येकी १५-१५ धावा केल्या. त्यानंतर आयसीसीने बाऊंड्री काउंटच्या नियमानुसार, इंग्लंडला विश्वविजेता ठरवले. या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडपेक्षा अधिक बाऊंड्रीज मारल्या होत्या. (षटकार आणि चौकारासह) सामन्यात न्यूझीलंड मूळ न्यूझीलंड वंशाच्या बेन स्टोक्सने ८४ + सुपर ओव्हरमधील ८ धावांसह  ९२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते.  

आयसीसीचा नियम पूर्वीपासूनचा, 'बाऊंड्री काउंट' वादावर मॉर्गनचा षटकार

मुलाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देताना गेरार्ड म्हणाले की, स्टोक्सच्या कामगिरी आनंद देणारी आहे. या सामन्यात न्यूझीलंडही इंग्लंड इतकेच विजेतेपदासाठी पात्र होते. त्यामुळे इंग्लंड-न्यूझीलंड दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेता घोषीत करायला पाहिजे होते, असे वाटते. न्यूझीलंडचे माजी आंतरराष्ट्री रग्बी खेळाडू असलेल्या गेरार्ड यांनी आयसीसीचा बाऊंड्री काउंट नियम हैराण करणारा असल्याचे सांगत न्यूझीलंड संघाचे कौतुक केले. 

इंग्लंडला एक फुकटची धाव मिळाली, माजी पंच टॉफेल यांनी वेधलं लक्ष

सामन्याचा हिरो ठरलेला बेन स्टोक्सचा जन्म हा न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील आहे. वडील गरार्ड रग्बी प्रशिक्षकाच्या कामानिमित्त इंग्लंडला आल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी बेन इंग्लंडमध्ये आला होता. २०१३ मध्ये  गेरार्ड आपल्या न्यूझीलंडला पुन्हा परतले. मात्र बेन स्टोक्स इंग्लंडमध्ये स्थायिक झाला. तो इंग्लंडच्या राष्ट्रीय संघातून खेळत राहिला.