पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दादा म्हणतो, विराटच्या नेतृत्वाची तुलना नको!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली

विराटचे आयपीएल स्पर्धेतील नेतृत्व आणि  भारतीय संघातील नेतृत्वाची तुलना करु नये, असे सौरव गांगुलीने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे. विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चांगली कामगिरीची नोंद केली आहे. याशिवाय आगामी विश्वचषकात त्याला महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्यातील नेतृत्व कौशल्याचाही फायदा होईल, असेही गांगुली यावेळी म्हणाला. विराटच्या आयपीएलमधील अपयशी कामगिरीचा आगामी विश्वचषकात भारतीय संघावर काहीही परिणाम होणार नाही, असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला.  

यंदाच्या आयपीएल हंगामात विराटच्या नेतृत्वाखील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची कामगिरी निराशजनक राहिली. याउलट महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली. आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या ढिसाळ कामगिरीमुळे धोनी आणि रोहित या दोन यशस्वी कर्णधारांच्या तुलनेत विराट मागे पडल्यानंतर विराटच्या नेतृत्वाबद्दल उलट सुलट चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगल्याचे पाहायला मिळाले होते. 

पंतची यंदाच्या विश्वचषकात खेळण्याची आशा संपली

यावेळी गांगुलीने हार्दिक पांड्याच्या कामगिरीचेही कौतुक केले. आगामी विश्वचषकात हार्दिक पांड्या भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळाडू ठरेल. हार्दिक पांड्या सध्या चांगली कामगिरी करत आहे. त्याचा फॉर्म असाच राहिला तर भारताची दावेदारी आणखी भक्कम होईल, असे तो म्हणाला. तसेच पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ चांगली कामगिरी करेल, असा विश्वासही गांगुलीने व्यक्त केला. तो म्हणाला की, पाकिस्तानची इंग्लंडमधील कामगिरी चांगली आहे. गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडमधील कसोटी मालिकेतही चांगली कामगिरी करुन दाखवली आहे. दोन्ही संघातील आकडेवारीला मी फारसे महत्त्व देत नाही. दोन्ही संघ चांगला खेळ दाखवण्यासाठी उत्सुक असतील. विराट, रोहित आणि शिखर धवन यांनी चांगला खेळ केला तर पाकिस्तानच्या अडचणी वाढतील, असेही गांगुली म्हणाला. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Dont compare Virat Kohlis IPL captaincy record with that of India says Sourav Ganguly