पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डेव्हिड वॉर्नरने सचिन तेंडुलकरचा विक्रम टाकला मागे

डेव्हि़ड वॉर्नर

बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने धमाकेदार शतक नोंदवले. त्याने १४७ चेंडूत १६६ धावांची खेळी केली.  यात १४ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. यंदाच्या विश्वचषकातील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम त्याने सहाव्यांदा केला आहे. बांगलादेश विरुद्ध १५१ धावा पूर्ण करताच वॉर्नरच्या नावे सहा वेळा १५० पेक्षा अधिक धावा करण्याचा अनोख्या विक्रमाची नोंद झाली.

सहा वेगवेगळ्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध १५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा वॉर्नर हा एकमेव फलंदाज आहे. त्याने या खेळीने भारताचा माजी क्रिकेटर आणि विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिन तेंडुलकरने ५ वेळा १५० पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला आहे.  
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा १५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आघाडीवर आहे. त्याने तब्बल सात वेळा हा पराक्रम केला आहे. 

डेविड वॉर्नरचा १५० प्लस धावांचा रेकॉर्ड

 • पाकिस्तान विरुद्ध १७९ धावा
 • अफगानिस्तान विरुद्ध १७८ धावा 
 • दक्षिण आफ्रिका विरुद्ध १७३ धावा 
 • बांगलादेश विरुद्ध १६६ धावा 
 • श्रीलंका विरुद्ध १६३ धावा 
 • न्यूझीलँड १५६ धावा 

एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५० प्लस धावा करणारे फलंदाज

 • ७ वेळा - रोहित शर्मा  
 • ६ वेळा - डेव्हिड वॉर्नर
 • ५ वेळा - सचिन तेंडुलकर
 • ५ वेळा - ख्रिस गेल
 • ४ वेळा - हाशिम अमला
 • ४ वेळा - सनथ जयसूर्या
 • ४ वेळा - विराट कोहली 
 • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
 • Web Title:icc world cup 2019 david warner overtakes Sachin Tendulkar chris gayle in the list of most 150 odi scores Record