पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC World Cup 2019 : आफ्रिकेला धक्का, सलामीच्या सामन्यात स्टेन'गन' शिवाय मैदानात उतरणार

डेल स्टेन

विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. ३० मे रोजी दक्षिण आफ्रिका आणि यजमान इंग्लंड यांच्यातील लढतीने विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. विश्वचषकातील या सलामीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला आपल्या ताफ्यातील प्रमुख जलदगती गोलंदाज डेल स्टेन शिवायच मैदानात उतरावे लागणार आहे. 

Video : माहीने षटकाराने साजरे केले शतक!

आयपीएलच्या सामन्यादरम्यान डेल स्टेनच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्यापही पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे सलामीच्या सामन्यात तो मैदानात उतरणार नाही. डेल स्टेन भारताविरुद्ध ५ जून रोजी होणाऱ्या सामन्यात खेळेल, अशी आशा संघाचे प्रशिक्षक ऑटीस गिब्सन यांनी व्यक्त केली आहे. डेल स्टेन संघात कमबॅक करु शकला नाही तर दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेतील आव्हान आणखी जड होईल. 

Most Sixes Record In WC : षटकारांच्या आतषबाजीच्या विक्रमावर एक नजर

स्टेनने मंगळवारी संघासोबत सराव सत्रात भाग घेतला होता. मात्र तो फारच सावधपणे गोलंदाजी करताना दिसला. एवढेच नाही तर त्याला अर्ध्यातूनच मैदान सोडावे लागले होते. त्याने फलंदाजी करणेही टाळले. गिब्सन यांनी अभ्यास सत्रानंतर स्टेन लवकरच फिट होईल अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले की, "स्टेन सध्या पूर्णपणे फिट नाही. या स्पर्धेचा कालावधी लक्षात घेता त्याच्यावरील दबाव वाढवणे उचित वाटत नाही."