पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : आफ्रिकेला मोठा धक्का, स्टेन 'गन' निकामी

डेल स्टेन

विश्वचषकातील पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर आता दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का बसला आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर असणारा जलदगती गोलंदाज डेल स्टेन विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे. डेलच्या जागी दक्षिण आफ्रिकेन संघात बेउरन हेन्ड्रीकची निवड करण्यात आली आहे.     

स्पर्धेतील सलग दोन पराभवानंतर आफ्रिकन संघाचा स्पर्धेतील प्रवास हा खडतर मार्गावरुन सुरु आहे. उद्या (बुधवारी) दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय संघाविरुद्ध मैदानात उतरणार आहे. या सामन्यात त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यात आता प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाद झाल्यामुळे आफ्रिकेची डोकेदुखी आणखी वाढली आहे.