पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंग्लंडला चॅम्पियन ठरवण्याच्या निकषावर वादंगाचे सावट

रोहित शर्मा आणि युवराज सिंग

यजमान इंग्लंडने रोमहर्षक सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत तब्बल २७ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिला वहिल्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हरमध्ये रंगलेल्या थरारक खेळातही बरोबरी झाल्यानंतर इंग्लंडने सामन्यात सर्वाधिक बाऊंड्री लगावल्याच्या निकषावर त्यांना विश्वविजेता घोषित करण्यात आले. आयसीसीच्या या नियमावर आता प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. अनेक आजी-माजी क्रिकेटर या नियमावर आक्षेप नोंदवत आहेत. 

सचिन तेंडुलकरच्या 'वर्ल्ड कपXI'मध्ये धोनी नाही

भारताचा उप-कर्णधार आणि विश्वचषकातील गोल्डन बॅटचा मानकरी रोहित शर्माने आयसीसीने क्रिकेटमधील काही नियम पुन्हा तपासून पाहायला हवेत, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंगने ट्विटच्या माध्यमातून सुपर ओव्हरच्या निकालाबाबत नाराजी व्यक्त केली. आयसीसीचा हा नियम योग्य वाटत नाही. पण नियम नियम असतो त्यामुळे इंग्लंडचे अभिनंदन! न्यूझीलंडने अखेरपर्यंत संघर्ष केला. त्यामुळे त्याला त्यांचे अधिक कौतुक वाटते, असे युवरजने म्हटले आहे. त्याच्यासोबतच माजी क्रिकेटर आणि सध्याच्या खासदार गौतम गंभीर यांनी देखील नियमासंदर्भात नाराजी व्यक्त केली. हा नियम उपयोगी नाही, अशा शब्दांत त्यांनी आपला आक्षेप नोंदवला. 

ICC World Cup: जाणून घ्या पुढचा विश्वचषक कधी, कुठे खेळवला 

लॉर्डसच्या मैदानात रंगलेल्या रोमहर्षक सामन्यातील पराभवामुळे न्यूझीलंडची सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरण्याची संधी हुकली. मागील विश्वचषकातही किवी संघाने फायनलमध्ये धडक मारली होती. पण ऑस्ट्रेलियाकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यापूर्वी विश्वचषक १९८७ आणि १९९२ मध्ये इंग्लंडचा संघ सलग दोनवेळा फायनलमध्ये पराभूत झाला होता. तर २००७ आणि २०११ च्या विश्वचषकात श्रीलंकेच्या पदरी सलग दोनवेळा फायनलमध्ये पराभूत होण्याची नामुष्की ओढावली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc world cup 2019 cricket fraternity criticises icc for the boundary rule after england claim world cup title