पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: विराट-शास्त्रींना करावा लागेल CoA च्या बाउन्सरचा सामना

शास्त्री आणि विराट कोहली

विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर मायदेशी  परतताच कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री यांना प्रशासकीय समितीसमोर काही निर्णयाबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागू शकतात. सर्वोच्च न्यायालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेली भारतीय क्रिकेट मंडळाची प्रशासकीय समिती कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यासोबत चर्चा करणार आहे.  या बैठकीत इंग्लंड आणि वेल्स विश्वचषकामधील कामगिरीसंदर्भातील चर्चेसह आगामी टी-२० विश्वचकासंदर्भातही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात. 

स्टार्क टॉपर! रोहितला 'ओव्हर टेक' करण्याची रुट-विल्मम्सनकडे फायनल संधी  

प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय, डायना इडुलजी आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल रवि थोडगे यांच्याव्यतिरिक्त निवडसमितीचे अध्यक्ष एमकेप्रसाद देखील कर्णधार आणि प्रशिक्षकांसोबत चर्चा करणार आहेत. 
विनोद राय यांनी पीटीआयशी बोलताना म्हणाले की, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवि शास्त्री विश्रांती घेऊन परतल्यानंतर आम्ही आढावा बैठक घेण्याचे ठरविले आहे. सध्याच्या घडीला बैठकीची तारीख सांगणे शक्य नाही. पण बैठक निश्चित होईल. यावेळी निवड समितीसोबतही चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पराभवानंतर प्रथमच रोहितनं दिली 'ही' प्रतिक्रिया

यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले जात होते. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर भारताच्या आशा संपुष्टात आल्या. या पराभवामुळे कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवि शास्त्री आणि संघ व्यवस्थापनाला काही निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. 

रायडूची निवड का नाही केली?

विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड प्रक्रियेत चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायडूच्या नावाची चर्चा होती. मात्र, अखेरच्या क्षणी त्याचा संघात स्थान मिळाले नाही. त्याला राखीव खेळाडू म्हणून निवड केली असताना विजय शंकरच्या दुखापतीनंतर रायडूऐवजी मयंक अगरवालची निवड करण्यात आली. या निर्णयावर देखील बैठकीत प्रश्न उपस्थित केला जावू शकतो.  

धोनीला सातव्या क्रमांकावर का पाठवले?

न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघ तीन विकेट किपरसह मैदानात उतरला होता. मर्यादित षटकांच्या सामन्यात दिनेश कार्तिकवर विश्वास दाखवल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात. याशिवाय सेमीफायनलमध्ये धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याच्या भूमिकेसंदर्भातही कर्णधार आणि प्रशिक्षकांना उत्तर द्यावे लागू शकते.