भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंह धोनीला पुढच्या सामन्यात 'बलिदान बॅज' वापरण्यास आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) मनाई केली आहे. खेळाडूला कोणताही वैयक्तिक संदेश देता येणार नाही असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. धोनीला ‘बलिदान’ बॅज असलेले ग्लोव्ह्ज परिधान करण्यास परवानगी द्यावी, असे अपील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीकडे केले होते.
The regulations for ICC events do not permit any individual message or logo to be displayed on any items of clothing or equipment. In addition to this, the logo also breaches the regulations in relation to what is permitted on wicketkeeper gloves. #MSDHONI https://t.co/22TZNSfYpk
— ANI (@ANI) June 7, 2019
DhoniKeepTheGlove : ग्लोव्हजसाठी बीसीसीआयनं आयसीसीकडे मागितली परवानगी
आयसीसीच्या नियमावलीनुसार, सामन्यादरम्यान राजकीय, धार्मिक किंवा अन्य संदेश प्रदर्शित करण्याची परवानगी नाही. त्यामुळेच धोनीने 'बलिदान बॅज' असलेले ग्लोव्ह्ज सामन्यादरम्यान वापरू नये, असे आयसीसीने म्हटले होते. आयसीसीच्या विनंतीनंतर भारतीय चाहते नाराज झाले होते. त्यांनी धोनीला पाठिंबा दिला आहे. बलिदान बॅज असलेल्या ग्लोव्हजवर आक्षेप घेण्याचे कारण काय ही अभिमानाची बाब आहे, असे भारतीय चाहत्यांनी म्हटले आहे.
धोनीने ग्लोव्ह्जवरील 'बलिदान चिन्ह' काढावे, ICC ची विनंती
भारतीय लष्कराने २०११ मध्ये महेंद्रसिंह धोनीला लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल केली होती. यावेळी धोनीने पॅरा ब्रिगेडच्या अंतर्गत प्रशिक्षणही घेतले होते. धोनी भारतीय सैनाच्या १०६ पॅराशूट रेजिमेंटचा सदस्य आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनी हे विशेष बलिदान बॅज असलेले ग्लोव्ह्ज घालून मैदानात उतरला होता.
Dhoni Keep The Glove : ICC चा आक्षेप, क्रिकेटप्रेमींचा मात्र पाठिंबा