पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : #INDvBAN हिटमॅनच्या शतकानंतर आजीबाईंच सेलिब्रेशन

बर्मिंगहॅमच्या मैदानातील हा क्षण सोशल मीडियावर व्हायरल ( छाया सौजन्य: ट्विटर)

बर्मिंगहॅमच्या मैदानात भारत-बांगलादेश यांच्यातील सामन्यादरम्यान रोहित शर्माने शतकी खेळी करत लक्ष्य वेधलं. रोहितची बांगलादेश विरुद्धची खेळी त्याच्या चाहत्यांसह क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. बर्मिंगहॅमच्या मैदानातही सामन्यादरम्यान जल्लोष पाहायला मिळाला. 

भारत-बांगलादेश यांच्यातील सामना पाहण्यासाठी बर्मिंगहॅमच्या मैदानात उपस्थित असलेल्या आजी बाईंनीही सर्वांचे लक्ष वेधलं. रोहितने कारकिर्दीतील २६ वे शतक झळकावल्यानंतर पीपाणी वाजवत त्यांनी आनंद व्यक्त केला. भारतीय संघासह रोहित शर्माला प्रोत्साहन देणाऱ्या आजीबाईंचा जोश पाहण्याजोगा होता. 

ICC WC #INDvBAN : रोहितला संधी म्हणजे शतकाची नांदी!

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. रोहितच्या शतकाचे सेलिब्रेशन करणाऱ्या आजीबाईंना कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या कॅमेरामॅनचेही नेटकरी कौतुक करत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 camera man captured the amazing spirit this videos shows that age is just a number