पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : शिखर धवन संघासोबत राहणार, BCCI चे स्पष्टीकरण

शिखर धवन

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन हाताच्या अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतील उर्वरित सामन्यात मैदानात उतरणे कठिण झाले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नॅथन कुल्टर नीलच्या गोलंदाजीवर त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. दुखापत गंभीर असल्यामुळे या सामन्यात तो क्षेत्ररक्षणासाठी देखील मैदानात दिसला नव्हता. नॅथन कुल्टर नीलचा उसळत्या चेंडूने अंगठ्याला इजा झाल्यानंतर धवन शतकी खेळी करुन परतला होता. तो स्पर्धेतून माघार घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, बीसीसीआयने तो संघात कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, दुखापतग्रस्त धवनला तीन आठवड्यांची सक्तीची विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे साखळी सामन्यानंतर भारताने पुढील फेरीत प्रवेश केल्यास गब्बर पुन्हा मैदानात उतरु शकतो.

लंडन येथील द ओव्हलच्या मैदानात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धवनने १०९ चेंडूत ११७ धावांची भागीदारी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हा सामना भारताने ३६ धावांनी जिंकला होता. शतकी खेळी करणाऱ्या धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले होते. 

धवनची पॉन्टिंग-संगकाराशी बरोबरी, सचिन-सौरवच्या एक पाऊल दूर

शिखर धवन स्पर्धेतून बाहेर पडल्याच्या वृत्तानंतर त्याची जागा काण घेणार याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली होती. सध्याच्या घडीला संघात असणारा आणि दोन्ही सामन्यात संधी मिळालेला लोकेश राहुल पुढील सामन्यात भारतीय संघासाठी सलामीचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय राखीव खेळाडूंमधील ऋषभ पंत आणि अंबाती रायडू यांच्यातील कुणाला इंग्लंडहून बोलावणे येणार या चर्चेला बीसीसीआयने पूर्णविराम दिला आहे.  

 

ICC WC 2019, IndvsAus : गब्बरच्या खेळीनंतर भारताचा जबरदस्त विजय

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 big blow for team india as opener shikhar dhawan ruled out from cricket world cup