विश्वचषकातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार सराव शिबीरात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्याला अकरामध्ये स्थान मिळेल किंवा नाही, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतेही संकेत दिलेले नाहीत.
Look who's back in the nets 💪💪#TeamIndia #CWC19 pic.twitter.com/m8bqvHBwrn
— BCCI (@BCCI) June 25, 2019
पाकिस्तान विरुद्धच्या हायहोल्टेज सामन्यात स्नायू दुखापतीमुळे भुवनेश्वरला पाकच्या डावातील पाचव्या षटकातच मैदान सोडावे लागले होते. भुवीच्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघात युवा गोलंदाज नवदीप सैनीला नेट प्रॅक्टिस गोलंदाज म्हणून बोलवण्यात आले होते.
नेट प्रॅक्टिससाठी भारतीय ताफ्यात नेटाचा गोलंदाज
सैनी संघासोबत असल्याने भुवीची दुखापत गंभीर आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन भुवी सराव सामन्यात सहभागी झाल्याचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर भुवी लवकरच कमबॅक करेल, असे संकेत मिळआले आहेत.