पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

BCCI ने शेअर केला टीम इंडियाच्या भगव्या जर्सीचा फोटो

यजमान इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ अशी जर्सी घालून मैदानात उतरणार

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. या सामन्यात भारतीय संघ घालणार असलेल्या जर्सीचे डिझाइन नेमके कसे असेल, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून भारताच्या भगव्या रंगाच्या जर्सीचे राज अखेर उघडले आहे. या जर्सीमध्ये पुढच्या भाग हा निळ्या रंगाचा जर्सीच्या पुढच्या बाजूला इंडिया हे नाव भगव्या रंगात लिहिलेलं आहे. मागील बाजू आणि बाह्या संपूर्णपणे भगव्या रंगाचा आहे.    

विश्वचषक स्पर्धेपूर्वी आयसीसीने फुटबॉलच्या धर्तीवर घरच्या आणि घराबाहेरील स्पर्धेसाठी वेगवेगळ्या जर्सीच्या नियमाचा समावेश केला होता. या नियमावलीनंतर बीसीसीआयने भगव्या रंगाच्या जर्सीला पसंती दिली. त्यानंतर सोशल मीडियावर भारताच्या भगव्या जर्सीचे फोटो व्हायरल होत होते. व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे भारतीय संघांच्या जर्सीची डिझाइन नक्की कशी असेल, याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. भगव्या जर्सीच्या मुद्यावरुन राजकीय रंग देण्याचा प्रकारही घडला होता. 

अशी असेल विराट सेनेची भगवी जर्सी!