पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : पावसाचा लंकेला दुसऱ्यांदा फटका

पावासामुळे सामना रद्द

विश्वचषकातील ब्रिस्टॉलच्या मैदानावर खेळवण्यात येणारा बांगलादेश विरुद्ध श्रीलंका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. सततच्या पावसामुळे या सामना एक ही चेंडू न टाकता रद्द करावा लागला. दोन्ही संघाना प्रत्येकी एक-एक गुण देण्यात आला आहे. श्रीलंकेच्या संघाचा हा दुसरा सामना आहे ज्यात पावसाने खो घातला आहे. .यापूर्वी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. 

ICC WC 2019 : शिखर धवन संघासोबत राहणार, BCCI चे स्पष्टिकरण

आतापर्यंत स्पर्धेत खेळलेल्या ४ सामन्यांपैकी श्रीलंकेने एक सामना जिंकला असून त्यांना एका सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. तर दोन सामन्यांत पावसाने व्यत्यय आणल्याने त्यांना प्रत्येक सामन्यात एक-एक गुण मिळाल्याने त्यांच्या खात्यात ४ गुण जमा झाले आहेत. दुसरीकडे स्पर्धेत ४ सामने खेळणाऱ्या बांगलादेशच्या खात्यात या सामन्यानंतर ३ गुण जमा झाले आहेत. बांगलादेशला केवळ एक विजय मिळाला आहे.

ICC WC 2019 : #IndvsPak वर्ल्ड कपमधील 'फाइट'पूर्वी वातावरण 'टाइट'

१९९२ नंतर यंदाची विश्वचषक स्पर्धा ही राउंड रॉबीन पद्धतीने खेळवण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक संघासाठी प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण आहे. इंग्लंडमधील ढगाळ वातावरणामुळे पुढील सामन्यातही अशीच परिस्थिती राहिली तर गुणतालिकेत अनापेक्षित उलथापालथ पाहायला मिळू शकते.