पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019: भारत-श्रीलंका-पाकला जमलं नाही ते बांगलादेशनं करुन दाखवलं

यंदाच्या विश्वचषकात बांगलादेशची लक्षवेधी कामगिरी

आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील पाचव्या सामन्यात बांगलादेशने तगड्या आफ्रिकेला २१ धावांनी पराभूत करत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित ५० षटकात ६ बाद ३३० धावा उभारल्या होत्या. या सामन्यातील विजयासह  विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्यांदा शह देण्याचा पराक्रम बांगलादेशने आपल्या नावे केला. 

यापूर्वी २००७ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने आफ्रिकेला पराभूत केले होते. विश्वचषकात आफ्रिकेला दोनवेळा पराभूत करणारा बांगलादेश हा आशियातील एकमेव संघ आहे.  भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या बांगलादेशपेक्षा बलाढ्य क्षमता असलेल्या संघांना देखील विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेला केवळ एकदाच पराभूत करता आले आहे. 

ICC WC 2019 : पाकच्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद

बांगलादेशने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकटच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेला केवळ चारवेळा पराभूत केले आहे. त्यामध्ये विश्वचषकातील दोन सामन्यांचा समावेश आहे. यंदाच्या विश्वचकात दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभूत होण्याची नामुष्की ओढावली आहे. स्पर्धेतील सलग दोन पराभवामुळे भारताविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण बनला आहे. 

ICC WC 2019 : स्फोटक ख्रिस गेलचा पाकविरुद्ध विक्रमी 'विस्फोट'

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 bangladesh becomes first asian team to defeat south africa in world cup twice not even pakistan sri lanka and india have not done that