पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बाबरची लाराच्या विक्रमाशी बरोबरी, सचिनचे अव्वलस्थान आबाधित!

बाबर आझम आणि मास्टर ब्लास्टर सचिन

न्यूझीलँड विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर बाबर आझमने नाबाद शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यासामन्यात त्याने १०१ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीने त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला. २५ वर्षांपेक्षा कमी वयात विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे. 

#INDvWI: कोहलीनं सचिन, लाराचा विक्रम मोडला

विश्वचषक स्पर्धेत वयाच्या पंचवीशीच्या आत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ५२३ धावांसह अव्वलस्थानी आहे. १९९६ च्या विश्वचषकात सचिनने ५२३ धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आहे. डिव्हिलियर्सने २००७ च्या विश्वचषकात ३७२ धावा केल्या होत्या.

मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम धोक्यात, वॉर्नर करतोय पाठलाग!

१९९९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने ३५४ तर १९९२ च्या स्पर्धेत वेस्ट इंडिजचा ब्रायन लाराने ३३३ धावांची खेळी केली होती. बाबरने शतकी खेळीसह ३३३ धावा करत लाराशी बरोबरी केली आहे. सचिनच्या विक्रमापासून तो सध्या खूप दूर आहे.   

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Babar Azam is in decent company on Sachin Tendulkar Lara list Most runs scored by a batsman aged 24