पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर सचिन-रोहितचा विक्रम मागे टाकणे वॉर्नरला जमणार नाही

विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिनच्या नावे आहे.

न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माला मास्टर ब्लास्टर सचिनचा विक्रम मागे टाकण्याची संधी होती. रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषकात ९ डावात ६४८ धावा केल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात तो अवघ्या एका धावेवर बाद झाल्यानंतर सचिनचा ६७३ धावांचा १६ वर्षांचा विक्रम अबाधित राहिला. 

 

धोनीजी, निवृत्त होऊ नका! लतादीदींची भावनिक साद

भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर बर्मिंघमच्या मैदानात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर रोहितला मागे टाकून सचिनच्या विक्रम मोडणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात होता. मात्र इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नर अवघ्या ९ धावा करुन माघारी परतला आहे. यंदाच्या स्पर्धेत १० डावात त्याने ६४७ धावा केल्या आहेत. म्हणजे वॉर्नर अजूनही रोहित शर्मापेक्षा एका धावेनं मागे आहे. 

सेमीफायनलमधील पराभवानंतर कोहलीचा चाहत्यांना भावनिक संदेश 

जर इंग्लंडला पराभूत करत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात मजल मारली तर डेव्हिड वॉर्नरकडे यंदाच्या स्पर्धेत सर्वोच्च धावा करणाऱ्या रोहितचा विक्रम मागे टाकून सचिनचा १६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढण्याची संधी मिळेल. पण जर ऑस्ट्रेलियाचा प्रवास यजमान इंग्लंडने थांबवला तर यंदाच्या स्पर्धेत रोहित शर्मा सर्वोच्च धावा करणाऱ्या फलंदाजामध्ये अव्वल राहिल. याशिवाय सचिनचा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही अबाधित राहिल.     
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc world cup 2019 ausv eng sachin tendulkar highest score in world cup Record unbreakable rohit sharma miss now David Warner in Race But Possible only Australia Get Final