पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेटच्या 'पंढरीत' इंग्लंड-न्यूझीलंड पूर्ण करणार वर्ल्ड कपचं 'रिंगण'

इंग्लंड फायनलमध्ये

बर्मिंगहॅमच्या मैदानात दुसऱ्या सेमीफायनलमध्ये यजमान इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्स आणि १७.५ षटके राखून पराभूत करत दिमाखात फायनल गाठली. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्डसच्या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध आणि इंग्लंड हे दोन संघ रविवारी १४ तारखेला विश्वचषक उंचावण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. 

प्रथम फंलदाजी करताना ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर २२४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या सलामी जोडीने मजबूत सुरुवात देत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकलले. जेसन रॉय (८५) आणि जॉनी बेअरस्ट्रो (३४) या जोडीने पहिल्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी केली. स्टार्कने बेअरस्ट्रोला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कमिन्सने जेसन रॉयला ८५ धावांवार बाद केले. ही जोडी परतल्यानंतर जो रुट नाबा ४९ आणि कर्णधार इयॉन मॉर्गन नाबाद ४५ धावा करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. 

तत्पूर्वी फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियन डावाची सुरुवात खराब झाली. कर्णधार फिंच पहिल्याच चेंडूवर बाद झाला. जोफ्रा आर्चरने त्याला माघाली धाडले. त्यानंतर क्रिस वोक्सने डेव्हिड वॉर्नरला ९ धावांवर बाद केले.

#ENGvAUS, Video: संघाची काळजी, रक्तबंबाळ होउनही कॅरी खेळला 

ही जोडी परतल्यानंतर स्टिव्ह स्मिथने संयमी पवित्रा घेतला. हँण्डस्कोब ४ धावा करुन माघारी परतल्यानंतर स्मिथने कॅरीसह ऑस्ट्रेलियन डावाला आकार दिला. या दोघांनी १०३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुखापतीनंतर कॅरीने ४६ धावांची आश्वासक खेळी केली. तो बाद झाल्यानंतर अष्टपैलू मॅक्सवेल २२ आणि मिचेल स्टार्कने २९ धावांचे योगदान दिले. स्मिथ ८५ धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ४९ व्या षटकातच ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांत आटोपला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 Australia vs England 2nd Semi Final Live Cricket Score Commentary Final Result