पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्ल्ड कप 'फिव्हर' पाक-विंडीज सामन्यादरम्यान नाचला 'इंडियन लव्हर'

या छोट्या चाहत्याला भारतीय सामन्याची उत्सुकता (ट्विटर)

बाराव्या विश्वचषक स्पर्धेच्या हंगामात आज (शुक्रवारी) वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने पाकिस्तानचा अवघ्या १०५ धावांत आटोपले आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाला मैदानात पाहायला उत्सुक असणारा चाहत्याने पोस्टरबाजी केल्याचे पाहायला मिळाले. 

पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात एक छोटा क्रिकेट चाहता आम्हाला भारतीय संघाचा सामना पाहायचा आहे, अशा आशयाचा फलक घेऊन सीमारेषेला लागून असलेल्या बोर्डजवळ नाचवताना दिसले. एका नेटकऱ्याने ट्विटरवरवरुन हा फोटो शेअर केला आहे. हा मुलगा पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा सामना पाहायला मैदानात आल्याचा उल्लेखही ट्विटमध्ये करण्यात आला आहे. 

WC 2019: विराट वर्ल्डकप जिंकून देईल, कपिल पाजींना विश्वास

भारतीय संघ विश्वचषकातील आपला पहिला सामना ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तर या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील हायहोल्टेज सामना हा १६ जून रोजी रंगणार आहे. क्रिकेट चाहते या सामन्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. विश्वचषकात पाकिस्तानने भारताविरुद्ध एकदाही सामना जिंकलेला नाही. या स्पर्धेत पाकिस्तानी संघ भारताविरुद्धचा खराब विक्रम मोडीत काढेल, असे भाकित पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटर इंजमाम उल हक याने केले होते. मात्र स्पर्धेतील पाकची खराब सुरुवात यंदाच्या स्पर्धेत कायापालट करेल, असे कोण म्हणणार नाही. 

ICC चा क्रिकेट चाहत्यांना सवाल, रिप्लाय देण्यासाठी व्हिडिओ नक्की पाहा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: ICC World Cup 2019 Are You Waching India Child hood Fan Show Poster between West Indies vs Pakistan Match 2