पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC 2019 : लंकेनं अफगाणच्या जिगरबाज शहजाद्यांना रोखलं

नाजीबुल्लाह जादरान

कार्डिफच्या सोफिया गार्डन्सच्या मैदानात अफगाणिस्तानच्या जिगरबाज शहजाद्यांना रोखत श्रीलंकेने ३५ धावांनी विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने श्रीलंकेचा डाव ३६.५ षटकात २०१ धावांत आटोपला होता. पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, अफगाणिस्तानला ४१ षटकात १८७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला ३२.४ षटकात १५२ धावांपर्यंत मजल मारता आली. अफगाणिस्तानकडून नाजीबुल्लाह जादरानने ५६ चेंडूत ४३ धावांची खेळी करत एकाकी झुंज दिली. त्याच्याशिवाय हझरतुल्लाह झझाई (३०) आणि कर्णधार गुलाबदिन नैब (२३) धावांचे योगदान दिले. 

 'विराटची आक्रमकता अंहकार नव्हे तर आत्मविश्वास'

तो एवढ्यावर थांबला नाही तर त्याने लाहिरु थिरुमाने (२५),  कुशल मेंडिस (२) आणि मॅथ्यूजला खाते न खोलता माघारी धाडले. राशीदने सेट झालेल्या परेराला बाद करत श्रीलंकेच्या अडचणी आणखी वाढवल्या. त्यानंतर एकाही श्रीलंकन फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी श्रीलंकेची अवस्था ३३ षटकानंतर ८ बाद १८२ अशी झाली आहे. पावसामुळे खेळ थांबण्यात आला असून श्रीलंकेचा संघ दोनशेपर्यंत पोहचणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

श्रीलंकेकडून एन. प्रदीपने सर्वाधिक चार बळी टिपले. तर आपल्या यॉर्करने गेम एंड करणाऱ्या लसिथ मलिंगाने तीन जणांना तंबूत धाडले. इसुरु आणि परेरा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेत त्यांना उत्तम साथ दिली.   
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. कुशल परेरा (७८) आणि दिमुथ करुणारत्ने (३०) या जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी ९२ धावांची भागीदारी करत संघाचा डावाला आकार दिला. मात्र मोहम्मद नबीने करुणारत्नेला बाद करत ही जोडी फोडली.

WC INDvsSA Match preview: घायाळ आफ्रिकेसमोर भारतीय 

तो एवढ्यावर थांबला नाही तर त्याने लाहिरु थिरुमाने (२५),  कुशल मेंडिस (२) आणि मॅथ्यूजला खाते न खोलता माघारी धाडले. राशीदने सेट झालेल्या परेराला बाद करत श्रीलंकेच्या अडचणी आणखी वाढवल्या. त्यानंतर एकाही श्रीलंकन फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. परिणामी श्रीलंकेची अवस्था ३३ षटकानंतर ८ बाद १८२ अशी झाली होती. पावसानंतर खेळ सुरु झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांना श्रीलंकेच्या फलंदाजांनी ३६ .५ षटकात धावफलकावर २०१ धावा लावल्या होत्या.  
अफगानकडून मोहम्मद नबीने सर्वाधिक चार बळी घेतले. दवलत जादरन आणि राशिद खानने प्रत्येकी दोन तर हमीद हसनला एक विकेट मिळवण्यात यश आले.