पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#BANvAFG Controversy Video: तुम्हीच ठरवा हा झेल योग्य होता का?

हशमतुल्लाहचा वादग्रस्त झेल

विश्वचषक स्पर्धेतील साऊथहॅम्प्टनच्या मैदानात बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेला अफगाणचा संघ बांगलादेशचा स्पर्धेतील प्रवास थांबणार का? अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सामन्याच्या सुरुवातीपासून रंगल्याचे पाहायला मिळाले.  

या सामन्यातील पाचव्या षटकात अफगाणिस्तानच्या मुजीबने बांगलादेशला पहिला धक्का दिला. पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सलामीवीर लिटन दास १६ धावांवर झेलबाद झाला. हसमतुल्लाह शाहिदीने हा झेल टिपला. मुजीबचा चेंडू कवरच्या दिशेने टोलवल्यानंतर हशमतुल्लाहने चपळाई दाखवत हा झेल टिपला.

ICC World Cup 2019 Point Table: चौथ्या स्थानासाठी चार संघ 

मैदानातील पंचांनी लिटन दासला बाद ठरवल्यानंतर तिसऱ्या पंचांनी देखील यामध्ये हस्तक्षेप केल्याचे पाहायला मिळाले. रिप्लाय पाहून तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरवले. मात्र क्रिकेट चाहत्यांना पंचांचा हा निर्णय रुचलेला नाही. लिटन दास नाबाद असल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC World Cup 2019 afg vs ban hashmatullah shahidis catch to dismiss liton das during bangladesh vs afghanistan stirs controversy