पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशी असेल विराट सेनेची भगवी जर्सी!

 इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ भगव्या रंगाच्या जर्सीत उतरणार

भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकातील इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात भगव्या रंगाच्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. आयसीसीच्या सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, नव्या जर्सीचे कलर कॉम्बिनेशनचा पर्याय हा बीसीसीआयने निवडला आहे. भारतीय संघ आणि इंग्लंड दोन्ही संघ ब्लू रंगाच्या जर्सीत मैदानात उतरतात. यांच्यात एक  वेगळेपणा दिसावा अशा उद्देशातून ही कल्पना सूचल्याची माहिती देखील आयसीसीच्या सूत्राने दिली आहे.

भारतीय संघाच्या यूएसमध्ये डिझाइन करण्यात आलेल्या भगव्या रंगाची जर्सी ही संघाच्या जून्या टी-२० तील जर्सीप्रमाणे असणार आहे. विश्वचषकाच्या सुरुवातीपूर्वी आयसीसीने आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशी मैदानावर खेळताना दोन वेगवेगळ्या जर्सीचा पर्याय निवडण्याच्या नियमाचा समावेश करण्यात आला होता. या नव्या नियमानुसार, बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघासाठी ब्लू जर्सीनंतर दुसरा पर्याय म्हणून भगव्या रंगाच्या जर्सीची निवडली आहे.

ICC WC कोहलीची पावले चालती 'विराट' विक्रमाची वाट