पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC World Cup 2019 : शमीच्या खांद्यावर भुवीचे ओझे!

भुवी आणि शमी

भारतीय ताफ्यातील जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार विश्वचषक स्पर्धेतील आगामी दोन ते तीन सामन्याना मुकणार आहे.  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात स्नायू दुखावल्याने त्याला पहिल्या पॉवर प्लेमध्येच  मैदानातून बाहेर जावे लागले होते. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भुवीच्या जागी मोहम्मद शमीला संधी मिळेल असे संकेत कर्णधार विराट कोहलीने दिले आहेत.  

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्नायूच्या दुखापतीनंतर भुवनेश्वरला आपले तीसरे षटकही पूर्ण करता आले नव्हते. त्याने मैदानात सोडल्यानंतर विजय शंकरने पाकिस्तानच्या डावातील पाचवे षटक पूर्ण केले होते. पाचव्या षटकात गोलंदाजी करत असताना भुवनेश्वर कुमार पायाचा स्नायू दुखावला आहे. तो दोन ते तीन सामन्याला मुकणार असला तरी फिट होताच तो संघात पुन्हा परतेल. त्याची भूमिका आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे कोहली म्हणाला होता.

#IndvsPak : पाकविरुद्धच्या विक्रमी विजयामागची पाच प्रमुख कारणे

भारतीय संघ पुढील तीन सामन्यात २२ जून रोजी अफगाणिस्तान,  २७ जून रोजी वेस्ट इंडिज आणि ३० जूनला इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. दुखापतीमुळे सामन्याला मुकावे लागणारा भुवी भारतीय ताफ्यातील दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी अंगठा फॅक्चर झाल्याने धवनला सक्तीची विश्रांती देण्यात आली होती. धवनची जागा ज्याप्रमाणे लोकेश राहुलने भरुन काढली त्याच प्रमाणे मोहम्मद शमी भुवीची कमी भरुन काढणार का?  हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. यापूर्वी भुवीच्या अनुपस्थित त्याने भारतीय संघासाठी कमालीची कामगिरी करुन दाखवली आहे. याच कामगिरीची त्याच्याकडून कर्णधाराला आणि भारतीय संघाला अपेक्षा असेल.

ICC WC 2019 : नाद नाय करायचा! विराट ब्रिगेडचं 'मिशन फत्ते'


 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Word Cup Bhuvneshwar Kumar Out For 2 3 Games Says Captain Virat Kohli Mohammed Shami chance to playing eleven