पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्धची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

रोहित शर्मा आणि लोकेश राहुल

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारताच्या डावाला सुरुवात केली. मँचेस्टरच्या मैदानात  भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषक स्पर्धेतील सातवा सामना आहे. शिखर धवनच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल- रोहित शर्माने संयमी खेळ करत दहाव्या षटकात भारताला पन्नाशीच्या पार नेले. 

दरम्यान रोहित शर्माने ३४ चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. दुसऱ्या बाजूला लोकेश राहुल संयमी खेळ करत त्याला उत्तम साथ देत आहे. आतापर्यंत विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धची ही सलामीवीरांनी केलेली सर्वोच्च भागेदारी आहे. यापूर्वी विश्वचषकात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या सहा सामन्यात भारतीय सलामीवीरांनी २५, ९०, ३७,४८ आणि ३४ अशी सुरुवात दिली होती. 

भारत-आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात मैदानात खेळाडूंवर नेहमीच दबाव पाहायला मिळतो. लोकेश राहुलने आमिरचे पहिले षटक निर्धाव खेळून काढल्यानंतर त्याची प्रचती आली. त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी संयमी खेळी करत डाव पुढे सरकवला. पाकिस्तानच्या खेळाडूंनीही या विक्रमी शतकी भागीदारीला हातभार लावला. त्यांनी रोहित शर्माला धावबाद करण्याची एक संधी दवडली. या संधीचं रोहित-लोकेश राहुलने सोनं केलं. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc word cup 2019 Rohit Sharma Lokesh Rahul first 100 run opening stand for India against Pakistan in in World Cup record