पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'डेंजर झोन'मध्ये धावणाऱ्या आमिरला पंचांनी फटकारले

मोहम्मद आमिर

भारत आणि पाकिस्तान यांच्यात मँचेस्टरवर सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या सलामीच्या जोडीने चांगला खेळ दाखवत पाक गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलले. पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे मोहम्मद आमीरने पाकिस्तान कडून पहिले षटक टाकले. पहिले षटक निर्धाव टाकत त्याने भारतीय फलंदाजांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  

सलामीवीरांनी आमिरच्या गोलंदाजीवर संयमी पवित्रा घेतला असताना पंचांनी दोनवेळा आमिरला फटकारल्याचे पाहायला मिळाले. तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर पंचांनी त्याला पहिल्यांदा 'डेंजर झोन' मध्ये धावण्यासंदर्भात बजावले. पंचांच्या इशाऱ्यांनंतर कर्णधार सरफराजच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव उमटल्याचे पाहायाला मिळाले.

वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्धची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

आमिर व्यतिरिक्त पंचांनी या सामन्यात वहाब रियाझलाही 'डेंजर झोन'मध्ये धावू नये यासंदर्भात वॉर्निंग दिली. त्यानंतरच्या चेंडूवर त्याने लोकेश राहुलला बाद करत पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. 
मोहम्मद आमिर हा पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज आहे. या सामन्यात त्याने पहिल्या चार षटकात केवळ आठ धावा देत भारताच्या डावावर अंकून लावला. मात्र त्याला पहिल्या स्पेलमध्ये एकही विकेट घेता आली नाही.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc word cup 2019 India vs Pakistan Mohammad Amir receives two official warnings inside 1st 5 overs for running in the danger area