पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#EngvsAfg यजमानांच्या तिकडीनं पाडला धावांचा पाऊस!

इंग्लंडची विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या

इंग्लड आणि वेल्सच्या मैदानात धावांचा पाऊस पडणार अशी भाकित स्पर्धेला सुरुवात होण्यापासून करण्यात आली. मात्र स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर 'टॉस झाला खोटा कारण पाऊस आला मोठा' अशी परिस्थिती काही सामन्यात पाहायला मिळाली. त्यामुळे पैसा खर्च करुन धावांचा पाऊस पाहायला आलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. चार वर्षांतून होणारी क्रिकेटमधील मोठी स्पर्धा इंग्लंडमध्ये भरवलीच कशाला? अशा प्रतिक्रिया ही क्रिकेट चाहत्यांमधून उमटल्याचे पाहायला मिळाले. 

ICC WC 2019 : #IndvsPak: पाक पत्रकाराच्या गुगलीवर हिटमॅनचा मास्टर स्ट्रोक

त्यानंतर इंग्लंडच्या मैदानात सुरु असलेल्या विश्वचषकात खऱ्या अर्थाने क्रिकेट चाहत्यांना सुखावणारा धावांचा पाऊस अनुभवायला मिळाला. यजमान इंग्लंडने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात तब्बल ३९७ धावा कुटत विश्वचषकातील विक्रमी धावसंख्या उभारली. इंग्लंड संघाची ही विश्वचषकातील सर्वोच्च धावसंख्या आहे. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोच्या ९९ चेंडूतील ९० धावांची खेळी केली. त्याने या खेळीत ८ चौकार आणि ३ षटकार खेचले. जो रुटने ८२ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८८ तर कर्णधार इयोन मॉर्गनने ७१ चेंडूत १४८ धावांची तुफान फटकेबाजी केली. यात त्याने ४ चौकार आणि १७ षटकार खेचले. विश्वचषकात संघाकडून सर्वोच्च धावा नोंदवण्याचा विक्रम हा ऑस्ट्रेलियन संघाच्या नावे आहे.

ICC WC 2019 : होप! नर्व्हस नाइंटीचा तिसरा बळी!

२०१५ च्या विश्वचषकात पर्थच्या मैदानात रंगलेल्या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात निर्धारित ५० षटकात ऑस्ट्रेलियाने ६ बाद ४१७  धावा केल्या होत्या. या यादीत भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. २००७ च्या विश्वचषकात भारताने नवख्या बर्मुडा संघाविरुद्ध निर्धारित ५० षटकात ४१३ धावा केल्या होत्या. एकदाही विश्वचषक जिंकू न शकलेल्या दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक स्पर्धेत तब्बल दोनवेळा चारशेचा टप्पा पार केला आहे. त्यांनी २०१५ च्या स्पर्धेत आयर्लंडविरुद्ध ४०८ तर वेस्ट इंडिजविरुद्ध ४०८ धावा केल्या होत्या. १९९६ च्या विश्वविजेत्या श्रीलंकेनं संघाने जेतपद जिंकला त्या स्पर्धेत केनियाविरुद्ध ३९८ धावा केल्या होत्या.       
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Word Cup 2019 England vs Afghanistan Match 24 Cricket Score Jonny Bairstow Joe Root Eoin Morgan record