पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WC :#AusvsPak आमीरच्या 'श्रीमंती'नंतरही पाकच्या पदरी 'दारिद्रय'

डेव्हिड वॉर्नर

मोहम्मद आमिरच्या भेदक माऱ्यानंतरही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या पदरी निराशा पडली. विश्वचषकातील सतराव्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ४१ धावांनी पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानी संघाला ४५.४ षटकात २६६ धावांपर्यंत मजल मारता आली. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर फख्खर झमानला कमिन्सने खातेही उघडू दिले नाही.

आर. अश्विनची विश्वकरंडक स्पर्धेत टीम इंडियासाठी मोठी भविष्यवाणी

त्यानंतर मैदानात उतरलेला बाबर आझम संघाच्या खात्यात ३० धावांची भर घालून तंबूत परतला. त्याला नॅथन कुल्टर नीलने बाद केले. एका बाजूने मैदानात तग धरत इमाम उल हकने अर्धशतक झळकावले. तो संयमी खेळ करत डावाला आकार देत असताना पॅट कंमिन्सने त्याला बाद करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. मोहम्मद हाफिज (४६), कर्णधार सरफराज अहमद (४०), हसन अली (३२) आणि वहाब रियाझ यांची ४५ धावांची खेळी पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात असमर्थ ठरली. ऑस्ट्रेलियाकडून ऑस्ट्रेलियाकडून कंमिन्सने सर्वाधिक तीन बळी टिपले. तर स्टार्क आणि केन रिचर्डसन यांना प्रत्येकी दोन बळी मिळाले. यांच्याव्यतिरिक्त फिंच आणि नॅथन कुल्टर नीलने एक-एक बळी मिळवला.

धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचे शतक आणि कर्णधार  फिंचच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानसमोर ३०८ धावाचे लक्ष्य ठेवले आहे. विश्वचषकातील सतराव्या सामन्यात प्रथम फलंदाजीस मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. फिंचने ८४ चेंडूत ८२ धावा केल्या. यात त्याने ६ चौकार आणि ४ षटकार खेचले. दुसऱ्या बाजून वॉर्नरने पाकच्या गोलंदाजांचा समाचार घेत आपले शतक पूर्ण केले. डेव्हिड वॉर्नरने १११ चेंडूत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने १०७ धावा केल्या.

भारत-पाक जाहिरात युद्धावर सानिया मिर्झा भडकली

मोहम्मद आमीरने फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मैदानात उतरलेला स्टिव्ह स्मिथ १० धावा करुन तंबूत परतला. हाफिजने त्याला असिफकरवी झेलबाद केले. २० धावांवर खेळणाऱ्या ग्लॅन मॅक्सवेल शाहिन आफ्रिदीचा शिकार झाला. त्यानंतर एका बाजूला तग धरुन असलेल्या वॉर्नरचाही संयम ढळला. त्यालाही शाहिन आफ्रिदीने तंबूचा रस्ता दाखवला. 

त्यानंतर शॉन मार्श (२३) आणि उस्मान ख्वाजा (१८) धावांवर बाद करत आमीरने ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढवल्या. नॅथल कुल्टर नील (२), पॅट कंमिन्स (२), मिचेल स्टार्क (३) या तळाच्या फलंदाजांना फारशी चांगली खेळी करता आली नाही. परिणामी ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात ३०७ धावांत आटोपला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमीरने सर्वाधिक पाच बळी टिपले. तर शाहिन आफ्रिदीने दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला. हसन अली, वहाब रियाझ आणि मोहम्मद हाफिज यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Word Cup 2019 Australia vs Pakistan Match 17 Live Cricket Score Card Result Commentary