पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

T20 WC 2020: डान्समुळे पाक महिला क्रिकेटर ट्रोल, पाहा व्हिडिओ

पाकिस्तानी महिला संघातील खेळाडू

ऑस्ट्रेलियाच्या मैदानात यंदाची महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. २१ फेब्रुवारीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत दहा देशांचे संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आयसीसीने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे पाकिस्तानी महिला संघाला ट्रोल करण्यात येत आहे.  

VIDEO: गर्दीतून धोनीला बाहेर काढण्यासाठी हेअरस्टायलिस्ट झाली बॉडीगार्ड

आयसीसीने आपल्या अधिकृत अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये बॅटर इरम जावेद आणि मुनीबा अलीसोबत पाक संघातील अन्य महिला खेळाडू बॅटला माईकच्या अंदाजात पकडून गाणे गात नृत्य करताना दिसत आहेत. पाकिस्तानी महिला क्रिकेट संघ रॉक स्टार आहे, असे कॅप्शन आयसीसीने शेअर केलेल्या व्हिडिओला दिले आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

IPL 2020 :यंदा स्पर्धेत या नव्या गोष्टी पाहायला मिळणार!

नेटकरी पाकिस्तानी महिलांना खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देत आहेत. हा सर्व प्रकार करण्यापेक्षा क्रिकेट खेळायलला शिका, अशा आशयाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.  या स्पर्धेत पाकिस्तानी ब गटात आहे. या गटात त्यांच्यासमोर वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि थायलंडच्या महिला क्रिकेट संघाचे आव्हान असणार आहे. पाकिस्तानी महिला संघ स्पर्धेतील पहिला सामना २६ फेब्रुवारी रोजी वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध खेळणार आहे.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc womens t29 world cup icc shared a rockstar video of pakistan women cricket team fans trolled them