पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC W T20 WC : हरमनप्रीत ब्रिगेडला 'विराट' शुभेच्छा!

भारतीय महिलासंघाने पहिल्यांदा टी-20 विश्वचषक स्पर्धेची फायनल गाठली आहे.

महिला विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश करण्याचा पराक्रम हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने करुन दाखवला. सिडनीच्या मैदानात नियोजित सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे साखळी फेरीतील कामगिरीच्या जोरावर भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियात नवी इतिहास रचून मायदेशी परतावे, अशी इच्छा प्रत्येक भारतीयाची आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी भारतीय संघाचे अभिनंदन करत असून अंतिम सामन्यासाठी संघाला प्रोत्साहन देत आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही ट्विटरच्या माध्यमातून हरमनप्रित ब्रिगेडचे अभिनंदन केले असून फायनलसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

ICC T20 World Cup : भारतीय महिला संघाची अंतिम फेरीत धडक

विराट कोहलीनं ट्विटमध्ये लिहिलंय की,'टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवल्याबद्दल संघाचे खूप खूप अभिनंदन! आम्हाला तुमच्या कामगिरीचा अभिमान आहे. अंतिम फेरीत तुम्ही चांगल्या कामगिरीसाठी मनापासून शुभेच्छा! विराटसह सोशल मीडियावर महिला संघावर कौतुकाचा वर्षाव सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने सेमीफायनलमधील पावसाच्या व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीकडे राखीव दिवस ठेवावा, अशी मागणी केली होती. मात्र आयसीसीने ही मागणी धुडकावून लावली होती. परिणामी मोठ्या स्पर्धेत इंग्लंडच्या महिलांवर मैदानात न उतरता स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की ओढावली.

BCCI 'सिलेक्टर्सं'च्या मुलाखतीत धोनीच्या भविष्याबाबतचा प्रश्न

इंग्लंडची कर्णधीर हिथर नाइट हिने याबाद्दल नाराजी देखील व्यक्त केली. विश्वचषक स्पर्धेत अशा प्रकारचा पराभव वाट्याला येईल, असे वाटले नव्हते, अशा शब्दांत नाइटने आपल्या मनातील भावना व्यक्त केली. हरमनप्रीतनेही सेमीफायनल खेळल्याशिवाय अंतिम फेरीत प्रवेश मिळणे समाधानकारक नसल्याचे म्हटले आहे. सेमीफायनलसाठी राखीव दिवस असायला हवा होता, असे सांगत भविष्यात आयसीसीच्या स्पर्धेत ही वेळ येणार नाही, अशी भावना व्यक्त केली. 


 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc womens t20 world cup virat kohli wishes indian women team for entering world cup final for the first time