आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ८ मार्च (आंतरराष्ट्रीय महिला दिवस) रोजी मेलबर्नच्या मैदानात यजमान ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ उपांत्य फेरीत खेळलेल्या ताफ्यात एक बदल करणे अपेक्षित आहे. तर भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय ऐतिहासिक कामगिरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सामन्यातील विजयासह भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीतला गिफ्ट देण्यासाठी उत्सुक असतील.
स्थानिक क्रिकेटच्या बादशहाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे सध्याच्या घडीला भारतीय संघाचे पारडे जड आहे. पण आतापर्यंत सर्वाधिक विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलिया महिला अंतिम सामन्यात कमबॅक करण्यास सक्षम आहेत, याकडेही भारतीय संघाला दुर्लक्ष करुन चालणार नाही.
CBIvsCBI: राकेश अस्थानांना दिलासा, कोर्टाने क्लिन चिट स्वीकारली
आयसीसी महिला टी२० विश्वचषकात भारतीय महिलांनी आतापर्यंत तीन वेळा (२००९, २०१० आणि २०१८) मध्ये उपांत्यफेरी गाठली होती. पहिल्यांदाच भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला आहे. एका बाजूला भारतीय संघ कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरणार असे वाटत असताना ऑस्ट्रेलिया संघात जॉर्जिया वेरहमच्या जागेवर मॉली स्ट्रानोला संधी मिळू शकते.
ऑस्ट्रेलिया W संभाव्य इलेव्हन
बेथ मूने, एलिसा हिली, मेग लॅनिंग (कर्णधार), एश्लीग गार्डनर, रेचेल हायन्स, जेस जोनासन, निकोला कॅरी, डेलिसा किमिंस, मॉली स्ट्रानो, सोफी मॉलीन्यूक्स, मेगन शूट.
भारत W संभाव्य इलेव्हन : शेफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ति शर्मा, वेदा कृष्णामूर्ती, तानिया भाटिया, शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड.