पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

INDVsNZW T-20 WC: हॅटट्रिकसह भारतीय महिलांनी दिमाखात गाठली सेमीफायनल!

भारतीय महिला संघाची सेमीफायनलमध्ये धडक

ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक नोंदवत भारतीय महिलांनी सेमीफायनलमधील प्रवेश निश्चित केला. गुरुवारी मेलबर्नच्या जंक्शन ओव्हलच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांनी न्यूझीलंडला चार धावांनी पराभूत केले. सलामीची फलंदाज शेफाली वर्माने केलेल्या ४६ धावा आणि ताफ्यातील फिरकीच्या जोरावर भारतीय महिलांनी स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला. 

टी-२० विश्वचषकात शतकासह या महिला खेळाडूनं रचला अनोखा विक्रम

या सामन्यात प्रथम फंलदाजी करताना भारतीय महिलांनी निर्धारित २० षटकात १३४ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या महिलांना निर्धारित २० षटकात ६ बाद १२९ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय महिलांनी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या १३ धावांवर न्यूझीलंड महिला संघाने आपली पहिली विकेट गमावली. अवघ्या ३४ धावांत न्यूझीलंडची आघाडीच्या फलंदाज माघारी फिरल्यानंतर मेडीआणिर कॅटीने चौथ्या विकेटसाठी ४३ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. धावफलकावर ७७ धावा असताना मेडीने वैयक्तिक २४ धावांवर आपली विकेट गमावली. तिच्यापाठोपाठ कॅटीही २५ धावांवर बाद झाली. अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर केरीने १८ चेंडूत ३४ धावांची धुंवाधार खेळी करत न्यूझीलंडला विजयापर्यंत आणले. मात्र अखेरच्या षटकात शिखा पांडेने किफायतशीर गोलंदाजी करत भारताला विजय मिळवून दिला.

स्टीव्हच्या चेहऱ्यावर पुन्हा 'कॅप्टन्सी'चं स्मित हास्य दिसणार

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून शेफाली वर्माने ३४ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने ४६ धावांची खेळी केली. तानिया भाटियाने २५ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २३ धावांचे यागदान दिले. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी रचली. स्मृती मानधना (११) आणि जेमेमा रोड्रिग्ज (१०) या स्वस्तात माघारी फिरल्या. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रित अवघ्या एका धावेवर बाद झाली. तिने बांगलादेश विरुद्ध ८ आणि ऑस्ट्रेलियाच्या विरोधात अवघ्या दोन धावा केल्या होत्या. दीप्ती शर्मा ८, वेदा कृष्णामूर्ती ६ , शिखा पांडे (१०) आणि राधा यादव (१४) यांनी आठव्या विकेटसाठी २२ धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या १३३ धावांपर्यंत पोहटवली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Womens T20 World Cup 2020 India Women won by 4 runs against New Zealand Women and enter semifinals