पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC Womens T20 WC : भारताचा सलग दुसरा विजय

भारतीय संघाचा सलग दुसरा विजय

ऑस्ट्रेलियातील पर्थच्या मैदानावर बांगलादेश महिलांना १८ धावांनी पराभूत करत महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिलांनी सलग दुसरा विजय नोंदवला. भारताकडून पूनम यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या तर शेफाली वर्मा (३९) आणि जेमिमा रॉड्रीग्ज (३४) धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पर्थच्या मैदानावर नाणेफेक जिंकून बांगलादेश महिलांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. स्फोटक सलामी फलंदाज स्मृती मानधनाच्या अनुपस्थितीत तानिया भाटीया आणि शेफाली वर्माने भारताच्या डावाला सुरुवात केली. सलमा खातूनने तानिया भाटियाला अवघ्या दोन धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. शेफाली वर्माच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. पन्ना घोष हिने शेफालीला ३९ धावांवर बाद केले. शेफालीने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. 

जगात भारी सचिन-विराटचे ट्रम्पही निघाले फॅन  

पन्ना घोष हिने शेफालीला ३९ धावांवर बाद केले. शेफालीने १७ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ३९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. कर्णधार हरमनप्रित या सामन्यातही आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देण्यात असमर्थ ठरली. पन्ना घोष हिने तिला अवघ्या ८ धावांवर माघारी धाडले. रिचा घोषच्या रुपात सलमा खातूनने भारतीय संघाला पाचवा धक्का दिला. दीप्ती शर्मा ११ धावा करुन धावबाद झाली. वेदा कृष्णमूर्तीने ११ चेंडूत २० धावा आणि शिखा पांडेने ७ धावांच योगदान देत भारताची धावसंख्या निर्धारित २० षटकात १४२ धावांपर्यंत पोहचवली.

भारताचा मोठा विजय! अखेर राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीचा समावेश

भारतीय महिलांनी दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशी महिलांची सुरुवात खराब झाली. शिखा पांडेने सलामी फलंदाज शमीमा सुल्ताना हिला अवघ्या ३ धावांवर माघारी धाडले. मुर्शिदा खटूनने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ती मोठी धावसंख्या करेल असे वाटत असताना अरुंधतीन रेड्डीने तिच्या रुपात भारताला दुसरे यश मिळवून दिले. तिने ३० धावांची खेळी केली. त्यानंतर पूनम पांडेने तानिया भाटियाकरवी संजीदा इस्लामला १० धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. अरुंधती रेड्डीने फरगना हक हिला खातेही उघडू दिले नाही. निगर सुल्तानने बांगलादेशकडून सर्वाधिक ३५ धावांची खेळी केली. त्यानंतर पूनम पांड्येनं फहिमा खातून (१७) आणि झनारा आलम (१३) धावांवर बाद करत बांगलादेशच्या अडचणी आणखी वाढवल्या. अखेरच्या षटकात शिखा पांडेने रुमाना अहमदला १३ धावांवर बाद केले. बांगलादेसशी महिलांना निर्धारित २० षटकात ८ बाद १२४ धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयासह अ गटातील दोन पैकी दोन सामने जिंकत भारतीय महिला संघ गुणतालिकेत ४ गुणासह अव्वलस्थानी आहे.    

 

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Womens T20 World Cup 2020 India Women vs Bangladesh Women 6th Match Group A Cricket Score Final Result And Record