पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC W T20 WC : ज्या संघांनी स्पर्धेची सुरुवात केली शेवटही तेच करणार

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात रंगणार सलामीचा सामना

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये यजमान ऑस्ट्रेलियन महिलांनी दक्षिण आफ्रिकेला ५ धावांनी पराभूत करत फायनलमध्ये धडक मारली. तत्पूर्वी पहिला सेमीफायनल सामना रद्द झाल्यामुळे भारतीय महिलांनी फायनलचे तिकिट मिळवले होते. त्यामुळे ८ मार्चला मेलबर्नच्या मैदानात सलामीचा सामना खेळणारे अ गटातील भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघच स्पर्धेची शेवट करणार हे निश्चित झाले आहे. 

ICC W T20 WC : हरमनप्रीत ब्रिगेडला 'विराट' शुभेच्छा!

सिडनीतील मैदानातून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने स्पर्धेचा शुभारंभ झाला होता. सलामीच्या सामन्यात भारतीय महिलांनी यजमान ऑस्ट्रेलियाला १७ धावांनी पराभूत केले होते. या सामन्यात दीप्ती शर्माने सर्वाधिक ४९ तर सलामीची फलंदाज शेफाली वर्माने २९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केल्यानंतर पूनम यादवने ४ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला होता. 

Video : साडी नेसून फलंदाजी करत मितालीचा भारतीय संघाला खास संदेश

गत विजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय महिलांनी विश्वचषकाच्या फायनलपर्यंत पोहचण्याची क्षमता दाखवली. या सामन्यानंतर साखळी सामन्यातील सर्व सामने जिंकत भारतीय महिलांनी ते सिद्धही केले. आता फायनलमध्ये सलामी सामन्याची पुनरावृत्ती करुन गतविजेत्यांना पराभूत करत पहिला वहिला विश्वचषक उंचावण्याचे आव्हान भारतीय महिलांसमोर असेल. महिला दिनी भारतीय महिला आपल्यातील क्षमता दाखवून टी-२० क्रिकेट जगतात दबदबा निर्माण करण्याच्या संधीच सोन करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.