पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WT20 Final : जिंकायचं असेल तर शेफालीला लवकर बाद करा, ब्रेटलीचा ऑसी महिलांना सल्ला

शेफाली वर्माच्या खेळीनं ब्रेटलीही प्रभावित झाला आहे.

मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगणाऱ्या महिला विश्वचषकातील फायनलमधील दोन्ही संघ तुल्यबळ असल्याचे मत ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज ब्रेट लीने केले आहे. ब्रेटलीने आयसीसीच्या वेबसाइटवर लिहिलेल्या एका लेखातून जागतिक महिला दिनी फायनलमध्ये भिडणाऱ्या भारत आणि ऑस्ट्रेलियन महिलांच्या ताकद समान असल्याचा उल्लेख केला आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. 

ICC W T20 WC Final: ऐतिहासिक 'फाइट'साठी असा असेल भारतीय संघ

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगताना ब्रेटलीने सामन्याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे म्हटले आहे. त्याने लिहिलंय की, ऑस्ट्रेलिया महिलांनी चारवेळा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. घरच्या मैदानावर कोणत्या रणनितीने खेळावे याची त्यांचा चांगला अभ्यास निश्चित आहे. पण भारतीय महिलांनीही स्पर्धेत दमदार खेळ दाखवला आहे. फायनल सामन्याची तुलना अन्य कोणत्याही सामन्याशी करता येत नाही, असे सांगत सामन्याच्या निकालाबाबत अंदाज बांधता येणार नाही, असे ब्रेटलीने म्हटले आहे.  

INDvsAUS फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन PM अन् मोदींच्यात रंगला सामना

ऑस्ट्रेलियन महिला विश्वचषकातील सलामीच्या लढतीत भारतीय महिलांकडून पराभूत झाल्या असल्या तरी चारवेळा विश्वचषक जिंकल्याचा विक्रम त्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास फायदेशीर ठरेल. भारतीय महिलांनी ऐतिहासिक विजय मिळवला तर देशातील क्रिकेटमध्ये एक नवा आणि मोठा बदल पाहायला मिळेल, असे भाकितही ब्रेटलीने केले आहे. भारतीय संघाला ऐतिहासिक विजय मिळवायचा असेल तर शेफाली वर्माची खेळी महत्त्वाची ठरेल, असा उल्लेखही ब्रेटलीने केला आहे. ऑस्ट्रेलियन महिलांना विक्रमी जेतेपद मिळवायचे असेल तर त्यांनी शेफाली वर्माला लवकरात लवकर बाद करायला हवे, असा सल्लाही ब्रेटलीने दिला आहे. शेफालीचा खेळ पाहून ती १६ वर्षांची आहे असा विश्वासच बसत नाही, असेही त्याने म्हटलंय.