भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील सलामीच्या लढतीने यंदाच्या महिला टी-२० विश्वचषकाला सुरुवात होत आहे. भारतीय महिलांना अद्याप एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जात आहे. दुसरीकडे त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी म्हणून यजमान ऑस्ट्रेलियन महिला संघाकडे पाहिले जात आहे. सलामी सामन्यातील हेच दोन संघ फायनल खेळतील, असे तर्कही लावले जात आहेत.
कलम ३७०: J&K बोर्डाने असा केला रणजी संघातील खेळाडूंना संपर्क
२१ फेब्रुवारीला सिडनीच्या शोग्राउंड स्टेडियममध्ये दोन्ही संघ आमने-सामने असतील. गतविजेता ऑस्ट्रेलियन महिला संघ मागील स्पर्धेतील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. आपल्या कामगिरीत सातत्य ठेवण्यात भारतीय महिला अपयशी ठरल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या तिरंगी लढतीमध्ये फायनलमध्ये संघाला ऑस्ट्रेलियन महिलांकडून पराभवाची नामुष्की ओढावली होती.
T20 WC 2020: डान्समुळे पाक महिला क्रिकेटर ट्रोल, पाहा व्हिडिओ
आतापर्यंत सहावेळा महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली आहे. यातील चारवेळा ऑस्ट्रेलियन महिलांना बाजी मारली आहे. घरच्या मैदानात त्यांचा उत्साह आणखी उंचावेल यात शंकाच नाही. त्यामुळेच भारतीय महिला त्यांचे आव्हान कसे परतवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. शुक्रवारी २१ फेब्रुवारी १ वाजता महिला विश्वचषक स्पर्धेच्या या सलामी सामन्याची नाणेफेक होणार आहे. १ वाजून ३० मिनिटांनी सामना सुरु होईल. भारतामध्ये स्टार स्पोर्ट नेटवर्क आणि दुरदर्शनवर या सामन्याचा आनंद क्रीडा प्रेमींना घेता येईल.