ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाने सोमवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पर्थच्या मैदानात त्यांनी बांगलादेशच्या महिलांना १८ धावांनी पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ६ बाद १४२ धावा केल्या होत्या. बांगलेदश महिलांना हे आव्हान परतवण्यात अपयश आले.
ICC Womens T20 WC : भारताचा सलग दुसरा विजय
या सामन्यातील भारताच्या डावातील १७ व्या षटकात दीप्ती शर्मा धावबाद झाली. दीप्ती शर्मा आणि वेदा कृष्णमूर्ती यांच्यातील ताळमेळ ढासळल्याचे पाहायला मिळाली. दोघी एकाच एन्डला धावल्या. यात दीप्तीने आपली विकेट गमावली. आयसीसीने अधिकृत अकाउंटवरुन या घटनेचा फोटो शेअर करत दीप्ती अन् वेदाला ट्रोल केले आहे. आयसीसीच्या या ट्विटवर भारतीय चाहत्यांनी आयसीसीवर नाराजी व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारताचा मोठा विजय! अखेर राष्ट्रकुलमध्ये नेमबाजीचा समावेश
१७ व्या षटकात दीप्तीने चंडू टोलावला. दुसरी धाव घेण्यासाठी तिने पहिल्यांदा तयारी दर्शवली मात्र नंतर ती मागे फिरली. तिच्यापूर्वीच वेदा क्रिजमध्ये पोहचल्यामुळे पंचांनी दीप्तीला बाद दिले. दीप्तीने ११ धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर वेदाने ११ चेंडूत २० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. आयसीसीने दीप्ती अन् वेदा यांच्यातील फोटोसह १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील ध्रुव जुरेल आणि अथर्व अंकोलेकरच्या धावबादचा फोटो शेअर केला आहे.
History repeating 🙈#T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/LmwH5rwQM2
— ICC (@ICC) February 24, 2020
भारतीय क्रिकेट चाहत्यांना आयसीसीचा हा अंदाज रुचलेला नाही. त्यामुळेच या ट्विटवर आयसीसीच्या विरोधातील अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. सलामीची फलंदाज शेफाली वर्मा आणि जेमिमा रोड्रिग्जच्या धमाकेदार खेळीनंतर पूनम यादवच्या फिरकीतील कमालीच्या जोरावर या गोंधळानंतर भारताने बांगलादेशच्या महिलांना पराभूत केले.