पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टी-२० विश्वचषकात शतकासह या महिला खेळाडूनं रचला अनोखा विक्रम

इंग्लंडची कर्णधार हिथर नाइट

इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हिथर नाइट हिने क्रिकेटच्या मैदानात अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील थायलंड विरुद्धच्या सामन्यात हिथरने १०८ चेंडूत शतक साजरे केले. या षशतकासह महिला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारत शतक झळकवण्याचा आनोखा विक्रम तिने आपल्या नावे केला. 

रशियन सुंदरीचा टेनिसला अलविदा!

संघाने अवघ्या ७ धावात २ विकेट गमावल्यानंतर मैदानात उतरलेल्या हिथरने आश्वासक खेळी करत संघाचा डाव सावरला. तिने नॅट शिवरच्या साथीने १६९ धावांची नाबाद खेळी केली. महिला विश्वचषकातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. या दोघींच्या दमदार खेळीच्या जोरावर इंग्लंडच्या महिला संघाने निर्धारित २० षटकात १७६ धावा केल्या. यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचा ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात इंग्लंडने थायलंडला ९८ धावांनी पराभूत केले.  

Photos: रशियन टेनिस स्टार मारियाचे काही ब्युटिफुल Pic

थायलंडन महिलांना या सामन्यात फार काही चमक दाखवता आली नाही. सलामीची फलंदाज नॅटकॅन चँटमनने संघाकडून सर्वाधिक ३२ धावा केल्या. नेरुमोल चाईवाई आणि न्नपॅट कोचेरोकई या दोघींनी अनुक्रमे १९ आणि १२ धावा केल्या. या तिघींशिवाय अन्य फलंदाजानी सपशेल निराश केले. परिणामी थायलंड महिलांना निर्धारित २० षटकात ७ बाद ७८ धावांपर्यंतच मजल मारता आली.  इंग्लंड महिलांनी ब गटात दोन सामन्यातील पराभवानंत पहिला विजय मिळवला. या दोन संघाशिवाय या गटात वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान हे संघ आहेत.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Women s T20 World England s Heather Knight becomes first woman to score tons in all three formats