पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC WT20 WC: सेमीफायनलसाठी भारतीय महिलांसमोरील समीकरण

महिला t20

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलमधील संघ निश्चित झाले आहेत. भारतीय महिलांनी सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये स्थान पक्के केले होते. त्यापाठोपाठ अ गटातूनऑस्ट्रेलियन महिलांनी सेमीफायनलचे तिकीट मिळवले. ब गटात इंग्लंड महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांनी स्थान पक्के केले असले तरी सेमीफायनलमध्ये कोणता संघ कोणाशी भिडणार याचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

INDvSA: या ताफ्यासह आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार

मंगळवारी दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ आणि वेस्ट इंडिज महिला संघ यांच्यात साखळी सामन्यातील अखेरचा सामना रंगणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने बाजी मारली तर भारताचा सेमीफायनलमधील सामना हा इंग्लंडच्या महिला संघाशी होईल. जर दक्षिण आफ्रिकेचा महिला संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला तर दक्षिण आफ्रिकेचा संघ ब गटात सध्याच्या दुसऱ्या क्रमांकावर कायम राहिल आणि त्यांना सेमीफायनलमध्ये भारतीय महिला संघाचे आव्हान पेलावे लागेल. 

विक्रमी खेळीनंतर शेफाली म्हणाली, मुलांसोबत खेळल्याचा फायदा झाला

विश्वचषक स्पर्धेपूर्वी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये भारतीय महिलांनी इंग्लंडला पराभूत केले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलिय महिलांनी पराभवाचा धक्का दिला होता. मात्र विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला नमवून स्पर्धेतील प्रबळ दावेदार असल्याच्या दिशेने वाटचाल केली होती. भारतीय महिलांनी चारही सामने जिंकत दिमाखात सेमीफायनल गाठली असून कोणत्याही संघाला नमवून संघ यंदा पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी उत्सुक असेल.

INDvsNZ: फलंदाजांची पुन्हा हाराकिरी, दुसऱ्या डावातही निम्मा संघ तंबूत

महिला टी-२० विश्वचषकातील सेमीफायनलच्या दोन्ही लढती ५ मार्चला सिडनीच्या मैदानात होणार आहेत. पहिला सेमीफायनल सामना भारत विरुद्ध ब गटातील दुसऱ्या क्रमांकावर असणारा संघ यांच्यात खेळवला जाईल. तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ब गटात अव्वलस्थानी असलेल्या संघाशी भिडेल. ८ मार्चला महिला विश्वचषकातील फायनल लढत ही मेलबर्नच्या मैदानात रंगेल.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc women s t20 world cup 2020 semifinals prediction 1st semifinal ind w vs eng w 2nd semifinal sa w vs aus w