पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इंग्लिश महिलांना धोका, भारतीय महिलांना मिळेल थेट फायनलचा मोका

महिला क्रिकेट संघ

ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या आयसीसीच्या महिला टी-२० विश्वचषकात भारतीय महिलांनी दिमाखदार कामगिरी करत चौथ्यांदा सेमीफायनल गाठली आहे. भारतीय महिलांची आतापर्यंतची कामगिरी पाहता यंदा भारतीय महिला विश्वविजेत्या होऊन मायदेशी परततील असेच चित्र दिसत आहे. गुरुवारी सिडनीच्या मैदानात भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात पहिला सेमीफायनल सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजता या सामन्याला सुरुवात होईल. पण या सामन्यापूर्वी इंग्लिश महिलांच्या ताफ्याला धडकी भरवणारी बातमी आहे. 

सोळावं वरीस मोक्याचं! शेफालीनं तोऱ्यात गाठलं अव्वलस्थान

सिडनीमध्ये आगामी काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे जर गुरुवारी पाऊसाने खेळात व्यत्यय आणला तर इंग्लंड महिलांचा स्पर्धेतील प्रवास संपणार आहे. दुसरीकडे पावसाने थैमान घातले तर भारतीय महिलांना थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने सेमीफायनल सामन्यासाठी राखीव दिवसाची मागणी केली होती. पण आयसीसीने त्यांची मागणी फेटाळली होती.

आयपीएलवर आर्थिक संकट: विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसमध्ये कपात

त्यामुळे सेमीफायनलमध्ये पावसाचा व्यत्यय आला तर साखळी सामन्यातील गुणांच्या आधारे फायनलमध्ये कोण खेळणार याचा निवाडा केला जाईल. भारतीय महिला संघाने साखळी फेरीतील सर्वच्या सर्व चार सामने जिंकले आहेत. याचा भारतीय महिला संघाला फायदा मिळेल. महिला टी-२० विश्वचषकातील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. या दोन्ही संघात पावसाचा फटका हा यजमानांना बसेल. दक्षिण आफ्रिकन महिलांनी स्पर्धेत अव्वल खेळ दाखवला असून पावसाने खेळात व्यत्यय आणल्यास फायनल लढतही भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रंगल्याचे पाहायला मिळू शकते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Women s T20 World Cup 2020 1st Semifinal India w vs England w and 2nd Semifinal South Africa w vs Australia w what if both matches will wash out