पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

#INDvSA बुमराहच्या कॉलिटीवर नो डाउट, पण एकदा हे आकडे बघाच!

जसप्रीत बुमराह

भारतीय संघाच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहने आफ्रिकेच्या सलामीला तंबूत धाडत आपल्यातील सातत्य कायम असल्याचे दाखवून दिले. त्याच्या धारदार गोलंदाजीसमोर हाशिम आमला आणि क्विंटन डी कॉक सपशेल अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील चौथ्या चेंडूत क्विंटन डी कॉकच्या बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू धोनीच्या ग्लोजमध्ये विसावला नाही. सामना पाहत असलेल्या काहींनी यावेळी 'ओ माय गॉड..हे शब्द नक्कीच उद्गारले असतील. 

पण तो फक्त ट्रेलर होता पिक्चर तर अजून बाकी आहे हे दाखवून द्यायला बुमराहने जास्त वेळ घेतला नाही. याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर  बुमराहने हाशिम आमलाला रोहित शर्माकरवी झेलबाद करत विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला बळी मिळवला. क्रिकेटच्या आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या फॉर्मेटमधील पहिली विकेट मिळताना त्याने कसलेल्या फलंदाजाची शिकार केली आहे.  

वर्ल्ड कपसह मनंही जिंका, मोदींचा विराट ब्रिगेडला संदेश

एकदिवसीय सामन्यातील खाते उघडताना त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथला बाद केले होते. तर कसोटीमध्ये एबी डिव्हिलियर्स हा त्याची पहिली शिकार ठरला होता. टी-२० च्या मैदानात डेव्हिड वॉर्नरला तंबूत धाडत त्याने आपल्या विकेटचे खाते उघडले होते. आज आपल्या पहिल्या वर्ल्ड कपमध्ये त्याने हाशिम आमलाला बाद करत आपल्यातील क्वालिटी पुन्हा एकदा सिद्ध केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय त्याच्या आयपीएलच्या कामगिरीवर नजर टाकली तर विराटला त्याने आपल्या जाळ्यात अडकवल्याचे पाहायला मिळते. आयपीएलच्या मैदानात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या बुमराहने बंगळुरु रॉयलकडून खेळणाऱ्या विराटला बाद करत आयपीएलमधील विकेटचे खाते खोलले होते.  

 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC WC 2019 Jasprit Bumrah on fire South Africa loses both openers to him World Class bowling Record