दक्षिण आफ्रिकेत रंगलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने धक्कादायक निकालाची नोंद केली. गतविजेतेपदासह विक्रमी चारवेळा विश्वचषक उंचावणाऱ्या भारतीय संघाला त्यांनी पराभवाचा दणका दिला. या विजयासह बांगलादेशचा संघ पहिल्यांदा विश्व चॅम्पियन ठरला. मात्र या सामन्यानंतर मैदानात दोन्ही खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले.
Video U-19 WC : फायनलमध्ये 'जंटलमन गेम' बदनाम!
बांगलादेशच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष करताना प्रतिस्पर्धी भारतीय संघातील खेळाडूंच्या भावना दुखावणारे कृत्य केले. यातून दोन्ही संघात वादाला तोंड फुटले. चक्क मैदानात दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांसोबत भिडल्याचे पाहायला मिळाले. यासंदर्भातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बांगलादेशने विजयानंतर अघोरीपणा करायला नको होता, अशा आशयाच्या काही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. दुसरीकडे हा सर्व प्रकार जंटलमन गेम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या खेळाला बदनाम करणारा असल्याची भावनाही व्यक्त होत आहे. नेमकी चूक कोणाची असा प्रश्नही काहींना पडला आहे.
बांगलादेश U-19 वर्ल्डकपचा चॅम्पियन, भारताचा धक्कादायक पराभव
क्रिकेटच्या मैदानातील धक्काबुक्कीसंदर्भात आयसीसीकडून चौकशी करण्यात येणार आहे. युवा भारतीय संघाचे मॅनेजर अनिल पटेल यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. अंतिम सामन्यानंतर दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या वादाचा व्हिडिओ पाहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ यासंदर्भात निर्णय घेईल, असे ते म्हणाले. आयसीसी या घटनेला कोणाला दोषी ठरवणार आणि कोणत्या प्रकारची कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Video : ऑस्ट्रेलियन महिलांच्या गोलंदाजीवर सचिनची फटकेबाजी
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश कर्णधार अकबर अलीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले होते. गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत दबावाच्या सामन्यात युवा टीम इंडियाचा डावा अवघ्या १७७ धावांत आटोपला. भारताकडून यशस्वी जैस्वालच्या ८८ धावा वगळता अन्य कोणालाही समाधानकारक कामगिरी करता आली नाही. भारताने दिलेले हे आव्हान परतवून लावण्यात मैदानात उतरलेल्या सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात दिली. रवी बिश्नोईने चार बळी मिळवत सामना भारताच्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न केला. पण बांगलादेशी कर्णधार अकबर अलीने संयम दाखवत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.