पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : पाकविरुद्धच्या सामन्यातील हा अप्रतिम झेल पाहिलात का?

सक्सेनाने हॅरिसचा अप्रतिम झेल घेतल्याचे पाहायला मिळाले.

दक्षिण आफ्रिकेतील पोचेफस्ट्रमच्या मैदानात युवा भारतीय संघाने पाक संघाला अवघ्या १७२ धावांत आटोपले. पाक विरुद्धच्या सामन्यात भारतीय गोलंदाजीसह क्षेत्ररक्षणाचा अनोखा नजारा पाहायला मिळाला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मोहम्मद हॅरिसने कर्णधाराला साथ देत संघाचा डाव सावरण्याचा एक चांगला प्रयत्न केला. 

Under19 WC : भारत पाक सामन्याचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

पण अंकोलेकरने रोहेल नाझीर आणि मोहम्मद हॅरिसची जोडी फोडत भारताला मोठे यश मिळवून दिले. अंकोलेकच्या या विकेटमध्ये दिव्यांश सक्सेनाने मोठे योगदान दिले. त्याने हॅरिसचा अप्रतिम झेल घेतल्याचे पाहायला मिळाले. हॅरिसने १५ चेंडूत हॅरिसने १५ चेंडूत १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २१ धावांची खेळी केली.

घायाळ किवींचा जीव पुन्हा धोक्यात, संघासमोर केनविना खेळण्याची 'कसोटी'

हॅरिस तंबूत परतला तेव्हा पाक संघाने धावफलकावर १४६ धावा लावल्या होत्या. ३५ व्या षटकात तो बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाजांना मैदानात तग धरता आला नाही. कर्णधार रोहेल नाझीर ६२ धावा करुन परतल्यानंतर पाकिस्तानच्या दोनशेपार करण्याच्या आशाही संपल्या. ४२ व्या षटकातील पहिल्या चेंडूवर पाकिस्तानचा खेळ खल्लास झाला. हॅरिसची विकेट पडल्यानंतर पाकचा अर्धा संघ पाच षटके कशीबशी खेळला. यात त्यांनी केवळ २६ धावा काढल्या. त्यामुळेच ही विकेट भारतासाठी महत्त्वपूर्ण होती हेच स्पष्ट होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC Under 19 World Cup 2020 Semi Final 1 India U19 vs Pakistan U19 Watch Divyaansh Saxena outstanding catch