पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

U-19 WC Final : युवा टीम इंडियाला विराट-सचिनने दिल्या शुभेच्छा!

युवा टीम इंडिया

१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विक्रमी पाचव्यांदा मोहोर उमटवण्यासाठी युवा भारतीय संघ सज्ज झालाय. भारत-बांगलादेश यांच्यात अंतिम सामन्यात संघर्षमय लढत पाहायला मिळेल. युवा संघातील सलामीवीर यशस्वी जैस्वाल, फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी यांनी आपल्या संघाच्या इथपर्यंतच्या प्रवासात मोलाचा वाटा उचलला आहे.  

...आणि सचिन तेंडुलकरने स्वीकारले महिला क्रिकेटपटूचे चॅलेंज

दुसरीकडे युवा बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक मारली आहे. भारतीय संघाचे आव्हान पेलून पहिल्यांदा विश्वचषक उंचावण्यासाठी ते प्रयत्नशील असतील. प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरणाऱ्या युवा टीम इंडियाला वरिष्ठ भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, यांच्यसह चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  

NZvs IND ODI: किवींनी जीव काढला, सामन्यासह मालिका जिंकली

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून युवा टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत. या स्पर्धेतील कामगिरीत सातत्य कायम ठेवून तुम्ही देशासाठी आणखी एक ट्रॉफी जिंकाल! असा विश्वास सचिनने व्यक्त केलाय. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री युवा टीम इंडियाला शुभेच्छा देताना पाहायला मिळते. तुम्ही खूप चांगले खेळत आहात. हा खेळ कामय ठेवा. आम्ही तुमचा आजचा सामना नक्की पाहणार आहोत, असा उल्लेखही विराट कोहलीने व्हिडिओमध्ये केल्याचे पाहायला मिळते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: icc under 19 world cup 2020 india vs bangladesh virat kohli coach ravi shastri cheteshwar pujara ajinkya rahane mayank agarwal ravindra jadeja wish young brigade ahead of u 19 wc final watch bcci video