पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ICC U19 World Cup: ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन भारत सेमीफायनलमध्ये

ICC U19 World Cup: ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन भारत सेमीफायनलमध्ये

यशस्वी जयस्वाल (६२) आणि अथर्व अंकोलेकरच्या (नाबाद ५५) शानदार अर्धशतकानंतर कार्तिक त्यागी (२४ धावांवर ४ विकेट) आणि आकाश सिंह (३० धावांवर ३ विकेट) यांच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला मंगळवारी ७४ धावांनी पराभूत करत १९ वर्षांखालील विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारताने उपउपांत्य फेरीत ५० षटकांत ९ बाद २३३ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाला दिले. परंतु, भारताने ऑस्ट्रेलियाला ४३.३ षटकांत १५९ धावांवरच गुंडाळले.

हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर सौरव गांगुलीने केले भाष्य

भारताने सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करताना अनेक मोठे विक्रम आपल्या नावे नोंदवले. भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात सलग १०व्यांदा विजय मिळवला. दहाव्या विजयाबरोबरच भारताने ऑस्ट्रेलियाचा २००२-२००४मध्ये सलग ९ विजयाचा विक्रम मागे टाकला.

१९ वर्षांखालील विश्वचषकात सलग विजय मिळवणारे संघ
१०*- भारत, १९ वर्षांखालील (२०१९-वर्तमान)
९- ऑस्ट्रेलिया, १९ वर्षांखालील (२००२-२००४)

वर्कआऊटदरम्यान विराट कोहलीने केला स्टंट, पाहा VIDEO

२०१८च्या आयसीसीच्या १९ वर्षांखालील विश्वचषकात पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मालिकेतील सर्व ६ सामने जिंकले होते. आता २०२० मध्ये खेळल्या जात असलेल्या मालिकेत प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने आतापर्यंत चार सामने जिंकले आहेत. अशा पद्धतीने मालिकेत भारताचा हा सलग १० विजय ठरला आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc under 19 world cup 2020 india u 19 vs australia u 19 priyam garg team india break world records with 74 runs wins over ausrtalia