पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फायनलमधील राडा भोवला! बांगलादेशी खेळाडूंसह भारताच्या दोघांवर कारवाई

फायनलमधील राड्यासंदर्भात आयसीसीकडून कारवाई

दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात राडा घालणाऱ्या खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने कारवाई केली आहे.  याप्रकरणात बांगलादेशच्या तीन खेळाडूंसह युवा भारतीय संघातील दोघांनाही शिक्षा करण्यात आली. 
बांगलादेशच्या मोहम्मद तोहिद ह्रिदोय, शमिम हुसैन, राकिबुल हसन यांच्यासह आकाश सिंग आणि रवी बिश्नोई या दोन भारतीय खेळाडूंना आयसीसीचे कलम २.२१ चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी धरले आहे. अंतिम सामन्यात आपल्या फिरकीच्या जादूने भारताच्या विजयाची आस निर्माण करणाऱ्या रवी बिश्नोईवर कलम २.५ चेही उल्लंघन केल्याचा ठपकाही ठेवण्यात आहे. 

NZvsIND 3rd ODI : सामन्याच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर 

बांगलादेशच्या ह्रिदोय, हुसैन आणि भारताच्या आकाश सिंहला सहा डीमेरिट पॉईंट देण्यात आले आहेत. तर राकिबूल आणि रवी बिश्नोईला ५ डीमेरिट पॉईंट देण्यात आले आहेत. रवी बिश्नोईवर सामन्यादरम्यान विकेट घेतल्यानंतर आक्रमक आणि अशोभनीय जल्लोष केल्यामुळे कलम २.५ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या खात्या २ डीमेरिट पॉईंट जमा झाले आहेत.  रवी बिश्नोईने विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. पण, फायनल सामन्यादरम्यान झालेल्या प्रकारामुळे त्याच्या या कामगिरीला अखेरच्या क्षणी गालबोट लागले.

पाहा नेमकं काय आहे प्रकरण Video U-19 WC : फायनलमध्ये 'जंटलमन गेम' बदनाम!

विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेतील सामन्यात नियामांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करावी लागणे ही निराशाजनक बाब आहे. युवा खेळाडूंना पुढील प्रवासासाठी वर्तन सभ्य असावे याची जाणीव करुन देणेही गरजेचे आहे. त्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली, असे आयसीसीचे जनरल मॅनेजर गेऑफ यांनी म्हटले आहे. आयसीसीच्या नियमानुसार दोन वर्षांत एखाद्या खेळाडूच्या खात्यात ४ डीमेरिट पॉईंट जमा झाले तर त्याला एक सस्पेंशन पॉईंट मानला जातो. या परिस्थितीती आयसीसी खेळाडूवर  बंदीची कारवाई करु शकते. दोन सस्पेशन पॉईंट खात्यात असतील तर खेळाडूला एक कसोटी किंवा २ एकदिवसीय किंवा टी-२० सामन्याला मुकावे लागू शकते. दोन वर्षानंतर प्रत्येक खेळाडूचे डीमेरिट रेकॉर्ड नव्याने सुरु होते.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ICC U19 World Cup Ravi Bishnoi kash Singh among Bangladesh players players charged with violating by ICC after heated final