पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आपला सचिन बदलला नाही, ICC च्या 'त्या' ट्विटला क्युट रिप्लाय

पंच स्टिव्ह बकनर आणि सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची ओळख फक्त मैदानात विक्रम नोंदवण्यापूर्ती मर्यादित नाही. तर त्याला आपण गुणी आणि प्रामाणिक खेळाडू म्हणून ओळखतो. दोन दशकाहून अधिककाळ भारतीय क्रिकेटमध्ये बहुमूल्य योगदान देणाऱ्या सचिनने पंचांशी हुज्जत घातल्याचे आपल्याला कधीच पाहायला मिळाले नाही.

दादा म्हणतो, विराटच्या नेतृत्वाची तुलना नको!

क्रिकेटच्या मैदानात सचिन आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजाची जशी चर्चा रंगायची अगदी तशीच चर्चा सचिन आणि मैदानी पंच स्टिव्ह बकनर यांच्याबद्दलही रंगल्याचे आपण पाहिले आहे. अनेक सामन्यात बकनर यांनी सचिनला नाबाद असतानाही बाद ठरवले होते. त्यामुळे ही जोडी त्याकाळी चांगलीच चर्चेत असायची. 

IPL चा फायदा झाला, पाकच्या धुलाईनंतर जॉनीचे बोल

आयसीसीने नुकतेच सचिन-बकनर यांच्या मैदानातील आठवणींना उजाळा देणारे एक ट्विट केल्याचे पाहायला मिळाले. यात सचिनने आपल्या बालपणीचा सहकारी विनोद कांबळीला गोलंदाजी करताना टाकलेला चेंडू हा स्टिव्ह बकनर यांनी नो बॉल दिल्याचे दाखवण्यात आले होते. आयसीसीच्या या ट्विटला सचिनने आपल्या संयमी अंदाजात प्रत्त्युत्तर दिले. सचिनने रिट्विट करताना लिहेले आहे की,  कमीतकमी यावेळी मी फलंदाजी नाही तर गोलंदाजी करत आहे. पंचाचा निर्णय नेहमीच अंतिम असतो, अशा शब्दातून त्याने आपल्यातील प्रामाणिकपणा आणि पंचाचा मान राखण्याचा गुण अद्यापही कायम असल्याचे दाखवून देत क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:icc tried to troll sachin tendulkar with steve bucknor picture master blaster cheeky reply